राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी झाली सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:27 AM2020-08-03T06:27:56+5:302020-08-03T06:28:05+5:30

सर्वत्र दिव्यांची रोशणाई : जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक

Ayodhya city ready for Bhumi Pujan of Ram temple! | राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी झाली सज्ज!

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी झाली सज्ज!

Next

नितीन अग्रवाल /
त्रियुग नारायण तिवारी।

नवी दिल्ली/अयोध्या : राम मंदिराच्या बुधवारी होणाऱ्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजवले आहे. शहरातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आले असून तेथील इमारतींनाही रंगरंगोटी करून हा परिसर सुशोभित करण्यात आला आहे.

संपूर्ण अयोध्या नगरी विद्युत दिव्यांच्या रोषणाईने झळाळून उठली आहे. जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी शहराच्या सीमा सील करण्यात येणार आहेत तसेच संचारबंदीचाही आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल.
कोरोना साथीच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक आहे याचे भान राखत भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खूप कमी लोकांना कार्यक्रमाचे (पान ७ वर)

शिवसेना म्हणते, १ कोटी दिले; अध्यक्ष म्हणाले, मिळाले नाहीत

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २७ जुलै रोजीच आम्ही राम मंदिर उभारणीसाठी एक कोटींची धनराशी जमा केली आहे. पक्षाने आरटीजीएस करून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या या नावाने स्टेट बँकेच्या खात्यात जमा केली असून त्याची पोचपावती सुद्धा मिळल्याचे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी रविवारी स्पष्ट केले. अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त जवळ येत असतानाच विविध विषयांवर उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौºयात मंदिरासाठी शिवसेनेकडून एक कोटींच्या निधीची घोषणा केली होती. याबाबत, आज काही माध्यमांनी राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना (पान ७ वर)

अडवाणी, जोशींची उपस्थिती व्हिडीओद्वारे
भाजपचे ज्येष्ठ नेते व रामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी तसेच मुरलीमनोहर जोशी हे राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता नाही. लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वक्फ बोर्डालाही निमंत्रण
सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी, अयोध्येतील समाजसेवक व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मोहम्मद शरीफ, बाबरी मशीद खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांनाही निमंत्रण दिले आहे. इक्बाल अन्सारी यांचे वडील हातिम अन्सारी हे या खटल्यात मुख्य पक्षकार होते तसेच राममंदिर आंदोलनातील आघाडीचे नेते रामचंद्र परमहंस यांचे घनिष्ठ मित्रही होते.

Web Title: Ayodhya city ready for Bhumi Pujan of Ram temple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.