अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन मुहूर्तावर वाद; काशीचे साधू-संत, ज्योतिषांनी खडा केला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 04:18 PM2020-07-21T16:18:30+5:302020-07-21T16:42:27+5:30
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही आपल्या फेसबूक पेजवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.
वाराणसी - अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी साधारणपणे 12 वाजता भूमिपूजन करून मंदिर निर्माणाची आधारशिला ठेवतील. मात्र, अयोध्येत भूमिपूजनापूर्वीच, भूमिपूजनाच्या मुहुर्तावर वाद निर्माण झाला आहे. काशीतील संतांबरोबरच ज्योतिषीदेखील मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही आपल्या फेसबूक पेजवर एक पोस्ट करत, मंदिराच्या पायाभरणीसाठी अथवा भूमिपूजनासाठी निश्चित करण्यात आलेला 5 ऑगस्टचा मुहूर्त अशुभ असल्याचे म्हटले आहे.
12 वाजून 15 मिनिटांचा मुहूर्त सर्वात अशुभ -
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करतील. मात्र, मंदिराच्या भूमिपूजनाचा हा मुहूर्त त्या दिवशीचा सर्वात अशुभ मुहूर्त असल्याचे म्हटले जात आहे.
वादानंतर काशी विद्वत परिषदही दूर राहण्याच्या तयारीत -
यासंदर्भात नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसरा, अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन काशीच्या विद्वानांच्या देखरेखीत पार पडेल. काशी विद्वत परिषदेचे तीन सदस्य या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यात प्रसिद्ध जोतिषी रामचन्द्र पांडेय, काशी विद्वत परिषदेचे संयोजक डॉ. रामनारायण द्विवेदी आणि काशी हिंदू विश्वविद्यापीठाचे ज्योतिष विभागातील प्राध्यापकांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या वादानंतर दोन विद्वान आता स्वतःला कार्यक्रमापासून वेगळे करत आहेत. ते या प्रकरणावर बोलणे टाळत आहेत.
काशी विद्वत परिषदेचे संयोजक डॉ. रामनारायण द्विवेदी म्हणाले, मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काशी विद्वत परिषदेने सांगितलेला नाही. मात्र, मुहूर्तावर उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर रामनारायण द्विवेदी म्हणाले, हे भूमिपूजन खुद्द प्रभू श्रीरामांचे आहे आणि पायाभरणी स्वतः देशाचा राजा करत आहेत. यामुळे मुहूर्ताचे फारसे महत्व नाही.
महत्त्वाच्या बातम्या -
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस
बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप