Pathaan: "शाहरुखचा 'पठाण' ज्या थिएटरमध्ये लागेल ते थिएटर जाळून टाका", अयोध्येच्या महंतांचं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:03 PM2022-12-15T13:03:02+5:302022-12-15T13:07:16+5:30
Pathaan Movie: अयोध्येतील महंत राजू दास यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर बहिष्काराची मागणी केली आहे.
अयोध्या-
अयोध्येतील महंत राजू दास यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर बहिष्काराची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर पठाण चित्रपट ज्या ज्या सिनेमागृहांमध्ये लावला जाईल ते जाळून टाकण्याचंही आवाहन महंत राजू दास यांनी केलं आहे. शाहरुख खाननं सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप राजू दास यांनी केला आहे.
'पठाण'मध्ये पाहायला मिळणार दीपिकाचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, चाहते घायाळ!
अयोध्याचे महंत राजू दास म्हणाले, "बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये सातत्यानं सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल याचाच प्रयत्न केला जात आहे. हिंदू देवीदेवतांचा कसा अपमान करता येईल याची संधी शोधली जाते. पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं बिकनी परिधान करुन साधूसंतांची आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे"
'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता
राजू दास यांनी शाहरुखवर सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचाही आरोप केला. सिनेमात भगव्या रंगाच्याच बिकिनीचा वापर करण्याचं काय कारण होतं. हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासाठी हे मुद्दाम केलं गेलं. लोकांनीच यावर कठोर कारवाई केली पाहिजे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकावा. तसंच हा सिनेमा ज्या थिएटरमध्ये लागेल ते जाळून टाका. अशा लोकांसोबत अशाच प्रकारे वागायला हवं, असं राजू दास म्हणाले.
२५ जानेवारीला रिलीज होणार 'पठाण'
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झालं. यात दीपिकाचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. पण दीपिकानं या गाण्यात भगव्या रंगातील बिकीनीत दिसली आहे. यावरुनच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदू संघटनांनी दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीला विरोध केला आहे. हिंदू महासभाचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनीही 'पठाण' चित्रपटावर बहिष्काराची मागणी केलीय.