योगी सरकारचा मोठा निर्णय; अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 19:20 IST2023-12-27T19:19:41+5:302023-12-27T19:20:13+5:30
PM मोदींच्या हस्ते स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे, तत्पूर्वी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

योगी सरकारचा मोठा निर्णय; अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत भगवान श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेपूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येथील अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'अयोध्या धाम' जंक्शन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच अयोध्या दौऱ्यावर असताना रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या धाम नामकरण करण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर अनेक शहरांची आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. याच यादीत आता अयोध्या स्थानकाचेही नाव जोडले गेले आहे. अयोध्या जंक्शनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आणि अयोध्या दिल्ली वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे.
"The name of Ayodhya Railway Station has been changed to “Ayodhya Dham” Junction," tweets Lallu Singh Ayodhya Member of Parliament pic.twitter.com/eyWy2s2uzc
— ANI (@ANI) December 27, 2023
पीएम मोदींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या जंक्शनची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अयोद्या जंक्शनचे नाव बदलून अयोद्या धाम करण्याची इच्छा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. यानंतर बुधवारी अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम करण्यात आले. याला रेल्वे विभागाने दुजोरा दिला आहे.
या घोषणेने रामभक्त खूश आहेत. दरम्यान, 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमादरम्यान लाखो भाविक राम नगरी अयोध्येत दाखल होतील. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची येथे जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्यासह शेकडो व्हीव्हीआयपी आणि लाखो भाविक सहभागी होणार आहेत.