अनेकांचा हातभार; श्रीराम मंदिरासाठी 3200 कोटींचे दान, सर्वात मोठा दानवीर कोण? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:39 PM2024-01-22T17:39:20+5:302024-01-22T17:39:50+5:30

Ayodhya Ram Mandir: आज अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर रामलला मंदिरात विराजमान झाले.

Ayodhya Ram Mandir: From Commoners to Big Businessmen; 3200 crore donation for Shriram temple, who is the biggest donor? | अनेकांचा हातभार; श्रीराम मंदिरासाठी 3200 कोटींचे दान, सर्वात मोठा दानवीर कोण? पाहा...

अनेकांचा हातभार; श्रीराम मंदिरासाठी 3200 कोटींचे दान, सर्वात मोठा दानवीर कोण? पाहा...

Ayodhya Ram Mandir: आज अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. नागर शैलित बांधलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर अतिशय भव्य-दिव्य आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू होते. यासाठी देशासह जगभरातून देणग्या आल्या होत्या. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 1100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींनी सुमारे 3200 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

सर्वात मोठी देणगी कोणी दिली?
अंबानी-अदानी किंवा टाटा समूहासारख्या मोठ्या उद्योगपतींनी राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली असेल, असा तुमचा विचार असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी लोकांनी, सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी, साधू-संतांनी देणग्या दिल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसर, सुरतमधील हिरे व्यापारी दिलीपकुमार व्ही लाखी यांनी राम मंदिरासाठी 101 किलो सोने(सूमारे 68 कोटी रुपये) दान केले आहे. 

राम मंदिरासाठी दुसरी सर्वात मोठी देणगी कथाकार आणि अध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी दिली आहे. मोरारी बापू यांनी मंदिराच्या बांधकामासाठी श्री रामजन्मभूमी ट्रस्टला 18.6 कोटी रुपयांची देणगी दिली. मोरारी बापूंनी ही रक्कम लोकवर्गणीतून जमा केली. यापैकी त्यांनी भारतातून 11.30 कोटी रुपये, यूके आणि युरोपमधून 3.21 कोटी रुपये आणि अमेरिका, कॅनडामधून 4.10 कोटी रुपये जमा केले. मंदिराच्या उभारणीसाठी लोकांनी देणगी द्यावी, असे आवाहन ते आपल्या रामकथेमध्ये करायचे.

अयोध्येसाठी उद्योगपतींनी तिजोरी उघडली
डाबर इंडियाने राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी जाहीर केले आहे की, ते 17 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील काही भाग श्री जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला दान करणार आहेत. ITC श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राशी संबंधित असून, ते उद्घाटनाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत धूप दान करणार आहेत. हॅवेल्सने राममंदिर उजळून टाकण्यासाठी मोठे योगदान दिले. याशिवाय, इतर अनेक उद्योगपतींनी राम मंदिरासाठी भरभरुन दान केले आहे.

Web Title: Ayodhya Ram Mandir: From Commoners to Big Businessmen; 3200 crore donation for Shriram temple, who is the biggest donor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.