'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:48 PM2024-01-18T14:48:52+5:302024-01-18T14:49:48+5:30
आधी सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य केले आहे.
Ayodhya Ram Mandir Latest Updates: काही दिवसांपूर्वी हिंदू सनातन धर्मावर (Sanatan Row) वादग्रस्त वक्तव्य करणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरावर (Ram Mandir) वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या पक्षाचा(DMK) कोणत्याही धर्माला विरोध नाही, पण मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' असं स्टॅलिन म्हणाले.
मीडियाशा संवाद साधताना त्यांना राम मंदिराबाबत विचारण्यात आले. यावर उदयनिधी म्हणाले, 'डीएमकेचा (DMK) कोणत्याही धर्माला विरोध नाही, असे करुणानिधी नेहमीच सांगत होते. मंदिर (Temple) बांधण्यात काहीच अडचण नाही, पण मशीद (Masjid) पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही. अध्यात्मवाद आणि राजकारण यांना एकत्र करू नका.'
VIDEO | "கலைஞர் சொன்னதை போல மதத்திற்கோ நம்பிக்கைக்கோ திமுக எதிர்ப்புஇல்லை; ராமர் கோயில் வந்தது பிரச்சனை இல்லை, அங்குள்ள மசூதியை இடித்து விட்டு கோயில் கட்டியதால்தான் அதில் திமுகாவிற்கு உடன்பாடு இல்லை (Kalaignar (M Karunanidhi) had said that we are not opposing any religion or any… pic.twitter.com/SGTNr7fsMv
— Press Trust of India (@PTI_News) January 18, 2024
यावेळी त्यांनी राज्यातील विरोधी पक्ष असलेला AIADMK या सोहळ्याला उपस्थित न राहिल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. उदयनिधी म्हणाले, 'ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्यांनी आधीच कारसेवकांना अयोध्येला पाठवले आहे.' दरम्यान, उदयनिधी यांनी यापूर्वी सनातन धर्माची तुलना कोरोना आणि डेंग्यू यांसारख्या आजारांशी केली होती. यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. विशेष म्हणजे द्रमुकचा इंडिया आघाडीचा भाग असल्याने काँग्रेसवरही टीका झाली होती.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोधीपक्ष गैरहजर
सोमवार, 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर समितीने विरोधी पक्षांसह देशभरातील हजारो पाहुण्यांना निमंत्रणे पाठवली आहेत. पण, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षाने कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.