अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:03 AM2021-07-18T08:03:54+5:302021-07-18T08:05:09+5:30

अयोध्येत श्रीराम मंदिरात २०२३ अखेरपर्यंत दर्शन करता येणार आहे. तोपर्यंत गर्भगृहात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्थापन करण्यात येतील.

ayodhya ram mandir likely to open for darshan from 2023 end | अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार

अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार

googlenewsNext

अयोध्या : अयोध्येत श्रीराम मंदिरात २०२३ अखेरपर्यंत दर्शन करता येणार आहे. तोपर्यंत गर्भगृहात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्थापन करण्यात येतील. अर्थात, या मंदिराचे बांधकाम २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. 

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या १५ सदस्यीय समितीने इंजिनिअर आणि संबंधितांशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा केली आहे. ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, २०२३ च्या अखेरपर्यंत मंदिरात दर्शन करता येईल. ७० एकर परिसरात मंदिर असणार आहे. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते. मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील काम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कामाला गती येणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच

- आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे २०२४ च्या आधी दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

- या माध्यमातून भाजप दिलेला शब्द पूर्ण करणार आहे.

Web Title: ayodhya ram mandir likely to open for darshan from 2023 end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.