राम मंदिराचा आराखडा बदलणार, भूमीपुजनासाठी PMOला पाठवण्यात आल्या दोन तारखा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 09:15 PM2020-07-18T21:15:35+5:302020-07-18T21:23:31+5:30

बैठकीत मंदिराची उंची आणि निर्माणाच्या व्यवस्थेवरही चर्चा झाली. ही बैठक अयोध्या सर्किट हाऊसमध्ये दुपारी 3 वाजता सुरू झाली आणि सुमारे अडीच तास चालली.

Ayodhya Ram mandir trust meeting about discussion of foundation stone date | राम मंदिराचा आराखडा बदलणार, भूमीपुजनासाठी PMOला पाठवण्यात आल्या दोन तारखा

राम मंदिराचा आराखडा बदलणार, भूमीपुजनासाठी PMOला पाठवण्यात आल्या दोन तारखा

Next
ठळक मुद्देराम मंदिर निर्माणासंदर्भात रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची शनिवारी बाठक झाली.भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी ट्र्स्टच्यावतीने 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट या तारखा PMO ला पाठविण्यात आल्या आहेत.बैठकीत मंदिराची उंची आणि निर्माणाच्या व्यवस्थेवरही चर्चा झाली.

अयोध्या -राम मंदिर निर्माणासंदर्भात रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची शनिवारी बाठक झाली. या बैठकीत मंदिर भूमीपूजनाच्या तारखेवर चर्चा करण्यात आली. भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी ट्र्स्टच्यावतीने 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट या दोन तारखा पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पाठविण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाच्या तारखेसंदर्भात अखेरचा निर्णय पंतप्रधान कार्यालय घेईल.

याशिवाय, बैठकीत मंदिराची उंची आणि निर्माणाच्या व्यवस्थेवरही चर्चा झाली. ही बैठक अयोध्या सर्किट हाऊसमध्ये दुपारी 3 वाजता सुरू झाली आणि सुमारे अडीच तास चालली.

मंदिराचा आराखडा बदलणार - 
या बैठकीत मंदिराचा आराखडा बदलण्याचाही निर्णय घेण्यात आला. या मंदिराला आता तीन ऐवजी पाच घुमट असतील. याशिवाय आता मंदिराची उंचीदेखील प्रस्तावित डिझाईनपेक्षा अधिक असेल. 

बैठकीनंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, सर्व परिस्थिती व्यवस्थित झाल्यानंतर फंड एकत्र केला जाईल. आम्हाला वाटते, की 3-3.5 वर्षांच्या आत मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण होईल.

बैठकीला मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रादेखील उपस्थित होते. नृपेंद्र मिश्रा यांच्यासह अभियंत्यांचा एक चमूही अयोध्येत आहे. हा चमू मंदिर निर्माणाच्या बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवेल. राम मंदिराचे मॉडेल तयार करणारे चंद्रकांत सोमपुरा यांच्याशिवाय त्यांचा मुलगा निखिल सोमपुरा, हेदेखील अयोध्येत पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदींना आग्रह -
पंतप्रधान मोदी यांच्या अयोध्या कार्यक्रमासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची अधिकृत माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेली नाही. मात्र, पंतप्रधान मोदींनी अयोध्येत यावे यासाठी, ट्रस्टचे सदस्य आणि अयोध्येतील संत सातत्याने पंतप्रधानांना आग्रह करत आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारीच, अयोध्या धामच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेतला. यावेळी योगी म्हणाले, अयोध्येत येणाऱ्या कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. अयोध्येच्या विकासाची सर्व कामे योजनाबद्ध पद्धतीने सुरू आहेत. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळितपणे राहावी यासाठी रस्तेदेखील रुंद करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

सुशांत सिंह राजपूत प्रकरण; ...तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, कंगना रणौतची धक्कादायक घोषणा

उद्धव ठाकरेच लोकप्रिय मुख्यमंत्री; विरोधीपक्ष नेत्यांनी स्वप्नचं पाहावी, 'या' नेत्याचा फडणविसांना टोला

CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्‍टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार 

रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

Web Title: Ayodhya Ram mandir trust meeting about discussion of foundation stone date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.