जय श्रीराम! राम मंदिरात १०० कोटींचे दान; भाविकांच्या सढळ हस्ते देणग्या, हा आकडा कमीच?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 02:31 PM2024-02-26T14:31:01+5:302024-02-26T14:32:51+5:30

Ayodhya Ram Mandir: या रकमेत दानपात्र, ऑनलाइन व्यवहार यातून दिलेल्या देणग्यांचा समावेश नसल्याचे सांगितले जात आहे.

ayodhya ram mandir within a month of pran pratishtha ceremony an offering of 100 crore to ram lalla donations | जय श्रीराम! राम मंदिरात १०० कोटींचे दान; भाविकांच्या सढळ हस्ते देणग्या, हा आकडा कमीच?

जय श्रीराम! राम मंदिरात १०० कोटींचे दान; भाविकांच्या सढळ हस्ते देणग्या, हा आकडा कमीच?

Ayodhya Ram Mandir: बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. दररोज लाखो भक्त रामदर्शन घेत आहेत. तर दानधर्मही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आतापर्यंत सुमारे ६२ लाख भाविकांनी अयोध्येत येऊन रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. यातच आता भाविकांना रामलला दर्शन अधिक सुलभतेने घेता यावे, यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यातच एका महिन्याच्या काळात राम मंदिरात सुमारे १०० कोटींचे दान भाविकांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. 

प्राणप्रतिष्ठेपासून दररोज सुमारे दोन ते अडीच लाख भाविक रामलला दर्शनासाठी येत असल्याचा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा अंदाज आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांचा उत्साह प्रचंड आहे. गर्दी कमी झाल्यावर मग रामदर्शनासाठी जाऊ, अशी वाट भाविक पाहताना दिसत नाहीत. रामलला दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत आहेत. सर्वांना रामदर्शनाची उत्सुकता आहे. अयोध्येतील राम मंदिर इतर मंदिरांच्या तुलनेत कसे आहे, हे पाहण्यासाठीही लोक दर्शनासाठी येत आहेत, असे सांगितले जात आहे. 

राम मंदिरात १०० कोटींचे दान, हा आकडा कमीच? 

मिळालेल्या माहितीनुसार, रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यापासून एका महिन्यात १०० कोटींपेक्षा अधिकचे दान प्राप्त झाले आहे. भाविकांनी धनादेश किंवा पावतीद्वारे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला अर्पण केलेले हे दान आहे. तर, दानपेटी आणि ऑनलाइन बँक खात्यावर पाठवलेली रक्कम वेगळी आहे. त्याची माहिती बँकेमार्फत दिली जाणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या अयोध्या शाखेच्या व्यवस्थापकांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष  महंत गोविंद देवगिरी महाराज यांनी याबाबत सांगितले की, १९ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत ५० कोटींहून अधिक रुपये भाविकांनी दान-देणग्या दिल्या आहेत. अलीकडेच जमशेदपूर, झारखंड येथील एका कंपनीने रामललाला ११ कोटी रुपये अर्पण केले. 

दरम्यान, प्रभू रामचंद्रांच्या भक्तांनी मुक्त हस्ते सोने-चांदीही अर्पण केले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या एका महिन्यात २५ किलो चांदी आणि १० किलो सोने भक्तांनी रामलला यांना अर्पण केले आहे. या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, हार, छत्री, रथ, बांगड्या, याशिवाय इतर वस्तूंमध्ये खेळणी, दिवे, उदबत्ती स्टँड, धनुष्यबाण यांचा समावेश आहे. भाविकांनी सोन्या-चांदीची भांडी आणि रत्न अर्पण केली आहेत.
 

Read in English

Web Title: ayodhya ram mandir within a month of pran pratishtha ceremony an offering of 100 crore to ram lalla donations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.