"तारीख लिहून ठेवा आजच सांगतो की..."; अमित शाहांनी अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार हे सांगून टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 07:45 PM2023-01-05T19:45:04+5:302023-01-05T19:47:37+5:30

१ जानेवारी २०२४...ही तारीख व्यवस्थित नोट करुन ठेवा, पुढच्या वर्षी याच दिवशी अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेलं असेल, हे विधान दुसरं तिसरं कुणी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

ayodhya ram temple will be ready by 1 january 2024 says amit shah in tripura | "तारीख लिहून ठेवा आजच सांगतो की..."; अमित शाहांनी अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार हे सांगून टाकलं!

"तारीख लिहून ठेवा आजच सांगतो की..."; अमित शाहांनी अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार हे सांगून टाकलं!

Next

नवी दिल्ली-

१ जानेवारी २०२४...ही तारीख व्यवस्थित नोट करुन ठेवा, पुढच्या वर्षी याच दिवशी अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेलं असेल, हे विधान दुसरं तिसरं कुणी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. त्रिपुरामधील एका जाहीर सभेला सबोधित करताना अमित शाह यांनी राम मंदिराच्या निर्माणाबाबतची माहिती दिली आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेलं असेल असं अमित शाह म्हणाले. तसंच स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसनं राम मंदिराच्या उभारणीला कोर्टात अडथळे आणले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असंही ते पुढे म्हणाले. 

त्रिपुरातील धर्मनगर येथे जनतेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "काँग्रेस सरकार स्वातंत्र्यापासून राम मंदिराचा मुद्दा रखडवत आली आहे. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिला. मंदिराचं भूमिपूजन झालं आणि तातडीनं कामालाही सुरुवात झाली", असं अमित शाह म्हणाले. 

काँग्रेसवर हल्लाबोल
शाह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "सोनिया-मनमोहन सरकारच्या काळात पाकिस्तानातून घुसखोर येऊन आमच्या जवानांना मारून निघून जात होते, पण मोदी सरकारच्या काळात शेजारील देशानं उरी आणि पुलवामामध्ये चूक केली. पण ते विसरले होते की आता भारतात मोदी सरकार आहे. मोदी सरकारनं १० दिवसांत सर्जिकल आणि हवाई हल्ले करून पाकिस्तानला घरात घुसून दहशतवाद्यांचे तुकडे केले", असं अमित शाह म्हणाले. 

काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे काम मोदींनी केलं आहे, असं गृहमंत्री म्हणाले. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचं काम आम्ही केलं. रक्ताचे पाट वाहतील असं काँग्रेस म्हणायची, पण काश्मीरमध्ये आज शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय त्रिपुरातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्येकडील राज्यात दहशतवाद संपवून सर्वांगीण विकास केल्याचं शाह म्हणाले. 

Web Title: ayodhya ram temple will be ready by 1 january 2024 says amit shah in tripura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.