अयोध्येत खळबळ!; रामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह 16 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 02:57 PM2020-07-30T14:57:13+5:302020-07-30T15:07:24+5:30
कोरोना संक्रमित पुजारी हे राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. संक्रमित पुजाऱ्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
अयोध्या - अयोध्येत 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जोरदार जयारी सुरू आहे. मात्र, असे असतानाच येथील रामललाचे एक पुजारी आणि संरक्षणासाठी तैनात असलेल्या एक डझनहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोना अहवाल आल्यानंतर या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सॅम्पल घ्यायलाही सुरुवात करण्यात आली आहे. सांगण्यात येते, की मंदिरात या लोकांच्या संपर्कात आलेल्या भक्तांचेही सॅम्पल तपासले जात आहेत.
रामजन्मभूमीवर 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. यामुळे येथे जोरदार तयारी सुरू आहे. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अयोध्येचे निरीक्षण करून तयारीचा आढावा घेतला आहे.
तपासणीसाठी पाठवण्यात आले होते सॅम्पल -
सांगण्यात येते, की रामजन्मभूमीच्या सहायक पुजाऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर, त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याच बरोबर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचीही तपासणी करण्यात आली. यानंतर गुरुवारी सहाय्याक पुजाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अयोध्येत खळबळ उडाली आहे.
कोरोना संक्रमित पुजारी मुख्य पुजाऱ्यांचे शिष्य -
कोरोना संक्रमित पुजारी हे राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. संक्रमित पुजाऱ्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आता इतरही काही लोकांचे सॅम्पल तपासले जात आहेत. याशिवाय रामजन्मभूमीचा संपूर्ण परिसर सॅनिटाईझ केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे
15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन
आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करून शकतं राफेल
सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी