Ayodhya Verdict : हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी मदत करावी; रामदेव बाबांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 05:22 PM2019-11-09T17:22:27+5:302019-11-09T17:39:24+5:30
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.
मुंबई: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचे योगगुरु रामदेव बाबा यांनी देखील स्वागत केलं आहे.
रामदेव बाबा म्हणाले की, आयोध्या प्रकरणी हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. आता अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल. मशीद बांधण्यासाठी मुस्लिम बांधवांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे रामदेव बाबांनी सांगितले. तसेच हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी मदत करावी असं आवहान देखील रामदेव बाबा यांनी केलं आहे.
Baba Ramdev: This is a historic verdict. A grand Ram temple will be built. Decision to allot alternate land to Muslim side is welcome, I believe Hindu brothers should help in the construction of the Masjid as well. #Ayodhyajudgementpic.twitter.com/wcijPEkQ2Q
— ANI (@ANI) November 9, 2019
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील आणि येत्या काही दिवसात येऊ घातलेले विविध धर्मांचे सण अतिशय उत्साहात साजरे होतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी भारतभक्तीचा उल्लेख केला. भारतभक्तीचा हाच भाव देशात दिसतो आहे. हाच खरा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आहे. नव्या भारताच्या उभारणीसाठी आपण सगळे एकजुटीनं प्रयत्न करू,' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
Ayodhya Verdict: लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निकाल- फडणवीस #BabriMasjid#AyodhyaHearing#RamMandirhttps://t.co/rzuj1UZkkJ
— Lokmat (@MiLOKMAT) November 9, 2019