Ayodhya Verdict: बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हतीः सुप्रीम कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 11:01 AM2019-11-09T11:01:06+5:302019-11-09T11:07:42+5:30
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन सुरू
नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात निकालाचं वाचन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून सुरू आहे. शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बाबरी मशिदीवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हती, असं न्यायालयानं म्हटलं आहे. खोदकामानंतर पुरातत्व विभागानं केलेल्या दाव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय याकडे पुरावे म्हणून पाहतं. खोदकामानंतर सापडलेल्या कलाकृती या इस्लामिक नव्हत्या, असंदेखील सर्वोच्च न्यायालयानं निकालाच्या वाचनादरम्यान स्पष्ट केलं आहे.
Supreme Court: The claim of Nirmohi Akhara is only of management. Nirmohi Akhara is not a 'Shabait'. Arguments were made on archaeology report. Archaeological Survey of India's credentials are beyond doubt and its findings can’t be neglected #AyodhyaJudgmenthttps://t.co/2EgXqByewz
— ANI (@ANI) November 9, 2019
तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानं शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला. शिया आणि सुन्नी या दोन समुदायांमध्ये वाद आहे. वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्डची नसून आमची आहे, असा शिया बोर्डचा दावा होता. तो आधी अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळला होता. त्यामुळे शिया बोर्डनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानंदेखील त्यांचा दावा फेटाळला. याशिवाय निर्मोही आखाड्याचा दावादेखील न्यायालयानं फेटाळून लावला आहे.
अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. खास या निकालासाठी न्यायालयानं आजचा दिवस निश्चित केला आहे. या प्रकरणी न्या. रंजन गोगोई यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांशी अयोध्येतील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर सविस्तर चर्चा केली होती. याशिवाय देशभरातील सुरक्षा यंत्रणादेखील सतर्क आहेत.