Ayodhya Verdict: शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरील दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 10:47 AM2019-11-09T10:47:11+5:302019-11-09T10:56:58+5:30
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन सुरू
नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन सुरू आहे. या प्रकरणात शिया वक्फ बोर्डानं केलेला दावा न्यायालयानं फेटाळला आहे. शिया आणि सुन्नी या दोन समुदायांमध्ये वाद होता. वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्डची नसून आमची आहे असा शिया बोर्डचा दावा होता. तो आधी अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळला होता. त्यामुळे शिया बोर्डनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानंदेखील त्यांचा दावा फेटाळला. याशिवाय निर्मोही आखाड्याचा दावादेखील न्यायालयानं फेटाळून लावला आहे.
Chief Justice of India Ranjan Gogoi: We have dismissed the Special Leave Petition(SLP) filed by Shia Waqf Board challenging the order of 1946 Faizabad Court #AyodhyaJudgmentpic.twitter.com/hbwibSA3ov
— ANI (@ANI) November 9, 2019
अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. खास या निकालासाठी न्यायालयानं आजचा दिवस निश्चित केला होता. या प्रकरणी न्या. रंजन गोगोई यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांशी अयोध्येतील कायदा व सुव्यवस्था स्थितीवर सविस्तर चर्चा केली होती.
निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांचा तसेच सशस्त्र दलांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दोन्ही समाजांच्या बैठका घेऊन निकाल शांततेनं मान्य करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.