Black Fungus : एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध देणार, काम अंतिम टप्प्यात; स्वामी रामदेवांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 09:17 AM2021-06-01T09:17:32+5:302021-06-01T09:19:59+5:30
''आयएमए ना कुठली साइंटिफिक व्हॅलिडेशनची बॉडी आहे, ना त्यांच्याकडे कुठली लॅब आहे, ना त्यांच्याकडे कुणी वैज्ञानिक आहेत. आयएमए एक एनजीओ आहे," असेही रामदेव यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - आपण लवकरच ब्लॅक फंगसवरील औषध घेऊन येत आहोत, असा दावा योग गुरू स्वामी रामदेव यांनी केला आहे. ''अनेक प्रकारचे वाद उद्भवले असले तरी, मी 18 तास सेवाकार्य करतच आहे आणि एका आठवड्याच्या आत ब्लॅक फंगस, येलो फंगस आणि व्हाइट फंगसवरील इलाज आयुर्वेदाच्या माध्यमाने देणार आहे. काम झाले आहे आणि प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे," असे स्वामी रामदेव यांनी म्हणाले. त्यांनी हा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीवर बोलताना केला.
एवढेच नाही, तर ''आयएमए ना कुठली साइंटिफिक व्हॅलिडेशनची बॉडी आहे, ना त्यांच्याकडे कुठली लॅब आहे, ना त्यांच्याकडे कुणी वैज्ञानिक आहेत. आयएमए एक एनजीओ आहे," असेही रामदेव यांनी म्हटले आहे.
अॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री? म्हणाला...; बाबा रामदेवांनी शेअर केले दोन व्हिडिओ
योग आणि आयुर्वेदाचा अनादर झाला आहे. आयएमए सातत्याने बल्ब, पेंट आणि साबनाचे प्रमाणीकरण करण्याचे काम करत आहे. तर कोरोनिलला अप्रमाणिक म्हणून आयुर्वेदाची खिल्ली उडवली जात आहे. यावरून वाद आहे, मी असे बोललो आहे, असे स्वामी रामदेव म्हणाले.
कोरोना लसीकरण आणि अॅलोपॅथीसंदर्भात बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाराज झालेल्या संघटनांनी त्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही, तर विरोध आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)चे अध्यक्ष डॉक्टर मनीष म्हणाले, संस्थेशी संबंधित असलेले देशातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (आरडीए) 1 जूनला काळा दिवस पाळतील.