देवदूत! विदेशातील कोट्यवधींची ऑफर नाकारली; देशातील रुग्णांवर 100 रुपयात करतो उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:07 PM2023-03-15T12:07:04+5:302023-03-15T12:08:02+5:30
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, दुबईसह अनेक देशांतून कोट्यवधी रुपयांच्या नोकरीच्या ऑफर आल्या, पण डॉ. प्रियरंजन यांनी परदेशातील सुखसोयींऐवजी त्यांचे मूळ गाव निवडले.
आजही आपल्या समाजात असे काही लोक आहेत, ज्यांना परदेशातून आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ऑफर नाकारून स्वतःच्या देशात राहून देशसेवा करायची आहे. या लोकांच्या यादीत उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले आयुर्वेदिक डॉक्टर प्रियरंजन तिवारी यांचा समावेश आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, दुबईसह अनेक देशांतून कोट्यवधी रुपयांच्या नोकरीच्या ऑफर आल्या, पण डॉ. प्रियरंजन यांनी परदेशातील सुखसोयींऐवजी त्यांचे मूळ गाव निवडले. ही कुटुंबातील तिसरी पिढी आहे, जे हे क्लिनिक चालवत आहे.
प्रियरंजन यांचे वडील आणि आजोबाही या क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करायचे. डॉ. प्रियरंजन तिवारी हे किच्छा, उधम सिंह नगर येथील रहिवासी आहेत. बरेली-हल्द्वानी रस्त्यावर हनुमान मंदिराजवळ त्यांचे क्लिनिक आहे. रूग्णांकडून ते ओपीडी फी म्हणून फक्त 100 रुपये घेतात. यानंतर थेरपी इत्यादीनुसार वेगवेगळे शुल्क आकारले जाते. डॉ. तिवारी यांनी 2012 साली त्यांचे क्लिनिक सुरू केले. आज ते भारतातीलच नव्हे तर अनेक देशांतील रुग्णांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करत आहेत.
आयुर्वेदाबद्दल रूग्णांमध्ये वाढली जागरुकता
डॉ. प्रियरंजन तिवारी म्हणाले की, 2012 मध्ये जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित दवाखान्यातून सुरुवात केली तेव्हा फार कमी रुग्ण क्लिनिकमध्ये येत असत, परंतु कालांतराने रूग्णांमध्ये आयुर्वेदाविषयी जागरुकता वाढत गेली आणि आज भारतातच नाही. तर जगातील अनेक देशांतील रुग्णांवर त्यांच्या दवाखान्यातून उपचार केले जात आहेत .डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते भारतात उपचारासाठी येत आहे.
भारताबाहेर आयुर्वेदाचा डंका
डॉ. प्रियरंजन तिवारी यांनी सांगितले की, कोविडच्या आधी पाश्चिमात्य देश सोडले तर बहुतेक देशांमध्ये आयुर्वेदिक औषधांबाबत लोकांमध्ये कमी जागरुकता होती, परंतु कोरोनाच्या काळानंतर पाश्चात्य देशांतील लोकांमध्ये बरीच जागरूकता आली आहे. आयुर्वेदिक औषधाबद्दल.. त्यांनी सांगितले की, आज ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा यासह अनेक देशांतील रुग्ण ऑनलाईन सल्लामसलत तसेच उपचारासाठी भारतात येत आहेत. ते अनेक परदेशी रुग्णांवर उपचार करत आहेत. मणक्याचे उपचार, स्लिप डिस्क, सायटिका, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस या आजारांसाठी भारतात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.