आयुष चिन्हामुळे उत्पादनांना अस्सलपणा मिळेल - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:03 PM2022-04-21T12:03:50+5:302022-04-21T12:05:25+5:30
मोदी बुधवारी येथे महात्मा मंदिरात तीन दिवसांच्या ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इन्नोव्हेशन समीटच्या उद्घाटनानंतर ‘हिल इन इंडिया’वर बोलत होते.
गांधीनगर : पारंपरिक औषधी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत लवकरच ‘आयुष चिन्ह’ (आयुष मार्क) प्रारंभ करणार आहे. यामुळे देशात निर्माण होणाऱ्या आयुष उत्पादनांच्या दर्जाला अस्सलपणा (ऑथेनटिसिटी) मिळेल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले.
मोदी बुधवारी येथे महात्मा मंदिरात तीन दिवसांच्या ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इन्नोव्हेशन समीटच्या उद्घाटनानंतर ‘हिल इन इंडिया’वर बोलत होते. त्यांनी यावेळी आयुष उपचार पद्धतीचा लाभ घेण्यासाठी ज्यांना भारतात प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी विशेष व्हिसाही निर्माण केला जाईल, अशी घोषणा केली.
उद्घाटन समारंभास मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंड जुगनाऊथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसूस उपस्थित होते. आयुषचा अर्थ आयुर्वेद, योगा, नेचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी असा आहे. या पर्यायी औषधी व्यवस्थांसाठी देशात केंद्रीय मंत्रालय आहे.
आयुष चिन्हामुळे देशात आयुष उत्पादनांना अस्सलपणा मिळेल व उत्पादनांत आधुनिक तंत्रज्ञान वापरले, असेही सांगेल. यामुळे जगातील लोकांना आपण दर्जेदार आयुष उत्पादने खरेदी करीत आहोत, असा आत्मविश्वास मिळेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.