आझाद निलंबनाचे भाजपात पडसाद

By admin | Published: December 25, 2015 04:27 AM2015-12-25T04:27:52+5:302015-12-25T04:27:52+5:30

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अरुण जेटली व पर्यायाने भाजपाला अडचणीत आणणारे खा. कीर्ती आझाद यांच्या निलंबनाचे पक्षातही पडसाद उमटले आहेत

Azad suspended BJP's decision | आझाद निलंबनाचे भाजपात पडसाद

आझाद निलंबनाचे भाजपात पडसाद

Next

नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अरुण जेटली व पर्यायाने भाजपाला अडचणीत आणणारे खा. कीर्ती आझाद यांच्या निलंबनाचे पक्षातही पडसाद उमटले आहेत. आझाद यांनी त्यांच्या निलंबन प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. काँग्रेसनेही डीडीसीए प्रकरणावरून भाजपाला कोंडीत पकडले असून कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे.
बिहारमधील पराभवानंतर आडवाणी गटाने १० नोव्हेंबरला दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवेदन जारी करीत पक्षातील असंतोषाला तोंड फोडले होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही आझाद यांच्या निलंबनावरून मोदींवर टीका केली आहे. डीडीसीए घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Azad suspended BJP's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.