Azadi SAT: ISRO च्या SSLV 'आजादी सॅटेलाईट'चे प्रक्षेपण यशस्वी; पण संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 10:58 AM2022-08-07T10:58:01+5:302022-08-07T10:58:59+5:30

हे आझादी सॅटेलाईट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रवरून लॉन्च करण्यात आले आहे. हे लॉन्च करण्यासाठी भारताने पहिल्यांदाच SSLV रॉकेटचा वापर केला.

Azadi SAT Successful launch of ISRO's SSLV Azadi Satellite 750 girl students from 75 schools have made | Azadi SAT: ISRO च्या SSLV 'आजादी सॅटेलाईट'चे प्रक्षेपण यशस्वी; पण संपर्क तुटला

Azadi SAT: ISRO च्या SSLV 'आजादी सॅटेलाईट'चे प्रक्षेपण यशस्वी; पण संपर्क तुटला

googlenewsNext

ISRO Azadi Satellite : भारताचा तिरंगा आता अंतराळातही फडकणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनापूर्वीच भारताने आपले SSLV 'आझादी सॅटेलाईट' लॉन्च केले आहे. हे सॅटेलाईट 75 शाळांमधील 750 विद्यार्थिनींनी तयार केले आहे. हे आझादी सॅटेलाईट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रवरून लॉन्च करण्यात आले आहे. हे लॉन्च करण्यासाठी भारताने पहिल्यांदाच SSLV रॉकेटचा वापर केला.

यापूर्वी PSLV च्या सहाय्याने लॉन्च केले जात होते सॅटेलाईट - 
यापूर्वी, सॅटेलाईट लॉन्च करण्यासाठी PSLV चा वापर केला जात होता. याला मोठा खर्च येत होता. तसेच हे तयार करण्यासाठी 45 दिवस आणि 600 अभियंते लागत होते. PSLV लॉन्च करण्यासाठी पे लोड पूर्ण करण्यासाठी सॅटेलाइटची वाट पाहावी लागत होती. 

SSLV आल्यानंतर, जगात ISRO ची प्रतिष्ठा वाढली - 
SSLV फक्त 6 अभियंते केवळ एका आठवड्यात तयार करू शकतात.हे 10 किलोग्रॅम पासून ते 500 किलोग्रॅमपर्यंतचे सॅटेलाईट सहजपणे अंतराळात प्रक्षेपित करू शकते. PSLV च्या तुलनेत यासाठी येणारा खर्च हा तब्बल 10 पट कमी आहे. जर उपग्रह तयार असेल, तर रॉकेटही तयार आहे. SSLV आल्याने आता ISRO अंतराळ व्यवसायातील स्पर्धेत महत्वााची भूमिका पार पाडेल. अनेक छोट्या-छोट्या देशांच्य 500 किलो ग्रॅमपर्यंतच्या उपग्रहांसाठी हे एक वर्दान सिद्ध होईल.

दोन उपग्रह स्थापित करणार -
SSLV रॉकेट दोन उपग्रहांना अंतराळात 350 Km च्या कक्षेत स्थापित करेल. पहिले सॅटेलाईट अथवा उपग्रह हा 135 किलो ग्रॅम वजनाचा भू अवलोकन उपग्रह IOS 02 आहे. तर दुसरा उपग्रह आजादी सॅटेलाइट आहे. याचे वजन 7.5 Kg एवढे आहे.
 

Web Title: Azadi SAT Successful launch of ISRO's SSLV Azadi Satellite 750 girl students from 75 schools have made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो