आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
By admin | Published: June 28, 2017 03:13 PM2017-06-28T15:13:54+5:302017-06-28T15:49:48+5:30
समाजवादी पक्षाचे नेता आझम खान पुन्हा एकदा बरळले असून भारतीय जवानांवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - समाजवादी पक्षाचे नेता आझम खान पुन्हा एकदा बरळले असून भारतीय जवानांवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आझम खान यांनी भारतीय जवानांवर बलात्काराचा आरोप केला आहे. आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. ते बोलत आहेत की, "महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे"".
पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं आहे. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं आहे. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं आहे. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.
#WATCH Senior SP leader Azam Khan"s statement on the Army pic.twitter.com/17v4x6I92A
— ANI UP (@ANINewsUP) June 28, 2017
आझम खान यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ताज्या घटनेबद्दल बोलायचं झाल्यास बुलंदशहर सामूहिक बलात्कारावर त्यांनी केलेलं वक्तव्य. या सामूहिक बलात्काराला त्यांनी एक राजकीय षडयंत्र म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्या या वक्तव्याचं उत्तर मागितलं, तेव्हा मात्र आपल्या वक्तव्याच्या विपर्यास केल्याची पळवाट त्यांनी काढली. नंतर त्यांनी विनाअट माफीदेखील मागितली. न्यायालयाने त्यांचा हा माफीनामा स्विकार केला होता.