मजुराची व्यथा, 7 दिवस पोटात अन्नाचा दाणा नसताना चालतच केला 780 किमी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:27 AM2020-05-22T11:27:25+5:302020-05-22T11:31:09+5:30
कसलीही सुविधा नसताना उन्हा-तान्हात हे मजुर हजारो कि.मी पायपीट करत आपल्या घरी पोहचले. प्रवासादरम्यान अनेकजण उष्माघातानेही दगावले. तर काही कसे बसे सुखरूप घरी पोहचले.
कोरोना व्हॉयरसचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत चालला आहे. त्यामुळेच संपूर्ण देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. अशात अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यात सर्वात जास्त मजुरांचे जास्त हाल झाले. रोजगारांच्या शोधात परराज्यातून विविध शहरातून स्थलातरीत झालेल्या मजुरांनी अखेर आपल्या कुटुबियांसह परतीचा प्रवास केला. कसलीही सुविधा नसताना उन्हा-तान्हात हे मजुर हजारो कि.मी पायपीट करत आपल्या घरी पोहचले. प्रवासादरम्यान अनेकजण उष्माघातानेही दगावले. तर काही कसे बसे सुखरूप घरी पोहचले.
अशाच एका परप्रांतीय मजुरानं पानिपतहून दहा दिवस प्रवास करून आजमगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचला. या 10 दिवसात मजूरला फक्त 3 दिवसांचं जेवण मिळालं. 7 दिवस या मजुरानं उपाशीपोटी 780 किलोमीटरचा प्रवास केला.रामकेश गोंड असं या मजुराच नाव आहे. रामकेश हरियाणाच्या पानिपत येथे मोटार पार्ट्स कंपनीत बर्याच वर्षांपासून काम करत होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. अशात कंपनीकडून पगारही मिळाला नाही.पैस्यांचीही चणचण भासू लगाली. कंपनी मालकाला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र कोणत्याही प्रकारची मदत कंपनी मालकाकडून मिळाली नाही. जिथे प्रत्येकाने गरजुंना मदत करा असे सांगण्यात येत आहे. अनेकजण मदतीसाठी पुढे येत असताना कंपनीच्या मालकाने या मजुरांना वा-यावर सोडले. रामकेश आणि त्याचे सहकारी मोठ्या आर्थिक संकटात अडकले होते. त्यांच्यासमोर आता केवळ गावाला परत जाण्याचाच पर्याय शिल्लक होता.
शेवटी त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासदरम्यान पोलिसांनीच त्यांना मदतीतचा हात दिला. आपल्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावी पोहचवले. मजुरांवर उद्भवलेली ही परिस्थिती त्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहणार हे मात्र नक्की.