अजहर मसूद जिवंत; पण आर्मी हॉस्पिटलमधून हलविले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:55 AM2019-03-05T05:55:49+5:302019-03-05T05:56:01+5:30

जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर हा भारतीय हवाई दलाच्या कारवाईत मारला गेल्याची चर्चा सुरू असली तरी त्याच्या संघटनेने हे वृत्त फेटाळले आहे.

Azhar Masood alive; But shifted from Army Hospital | अजहर मसूद जिवंत; पण आर्मी हॉस्पिटलमधून हलविले

अजहर मसूद जिवंत; पण आर्मी हॉस्पिटलमधून हलविले

Next

श्रीनगर : जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर हा भारतीय हवाई दलाच्या कारवाईत मारला गेल्याची चर्चा सुरू असली तरी त्याच्या संघटनेने हे वृत्त फेटाळले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने रविवारी सायंकाळी ७ वाजता अजहरला रावळपिंडी येथील आपल्या हॉस्पिटलमधून बहावलपूरमध्ये हलविले आहे. ज्यावेळी अजहरच्या मृत्यूचे वृत्त येत होते त्याचवेळी पाकिस्तानी सैन्याने त्याला बहावलपूरच्या गोथ गन्नी स्थित जैशच्या कॅम्पमध्ये हलविले, असे सांगितले जात आहे.
जैशने पाकिस्तान सरकारवर असा आरोप केला आहे की, भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावापुढे सरकार झुकले आहे. अजहरची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली असून, त्याला सतत डायलिसिसची गरज भासते. गत काही महिन्यापासून पाकिस्तानच्या रावळपिंडी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुुरू होते.
रावळपिंडीत पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आहे. पुलवामामधील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने अजहरची सुरक्षा वाढविली होती. पाकिस्तान स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या १० कमांडोंचे संरक्षण त्याला देण्यात आले आहे.जैशने जाहीर केरे आहे की, मसूद अजहर जिवंत आहे आणि चांगला आहे. (वृत्तसंस्था)
>नजरबंद की अटकच?
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने आता अजहर मसूदविरुद्ध कारवाईचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, आता कोणत्याही क्षणी जैशविरुद्ध कारवाई होऊ शकते. भारतीय पायलट अभिनंदन यांची सुटका केल्यानंतर आता इम्रान खान सरकारचे हे दुसरे महत्वाचे पाऊल असेल. अजहरला घरात नजरबंद केले जाईल की, ताब्यात घेतले जाईल हे सांगता येणार नाही, असेही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
इराणनेही दिला इशारा
नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची धमकी इराणने दिली आहे. इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस कॉर्प्सचे (आयआरजीसी) कमांडर कासीम सोलेमनी यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सरकार आणि लष्कराला जाब विचारला आहे की, सीमेवरील आणि शेजारी देशांमधील अशांततेला तुम्हीच कारणीभूत आहात. पाकिस्तानने इराणच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Azhar Masood alive; But shifted from Army Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.