पीसीआयच्या सदस्यत्वाचा बी. आर. गुप्तांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:08 AM2020-06-05T05:08:52+5:302020-06-05T05:08:59+5:30
नवी दिल्ली : प्रेस कॉन्सिल आॅफ इंडियाचे (पीसीआय) सदस्य आणि भोपाळस्थित वृत्त संघटनेचे समूह संपादक बी. आर. गुप्ता यांनी ...
नवी दिल्ली : प्रेस कॉन्सिल आॅफ इंडियाचे (पीसीआय) सदस्य आणि भोपाळस्थित वृत्त संघटनेचे समूह संपादक बी. आर. गुप्ता यांनी पदाचा राजीनामा दिला.
राजीनाम्याचे कारण सांगताना गुप्ता यांनी म्हटले की सध्या ‘मोठ्या संकटात’ असलेल्या प्रसारमाध्यमासाठी मी व्यक्तीश: किंवा एकत्रितरित्या काम करण्यास समर्थ नाही. गुप्ता यांची पीसीआयच्या सदस्यपदी ३० मे, २०१८ रोजी तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली होती.
‘‘प्रेस कॉन्सिल आॅफ इंडियाचा सदस्य या नात्याने मी माझा राजीनामा दिला आहे’’, असे गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ते म्हणाले, पीसीआयची जबाबदारी प्रसारमाध्यमाला आणि त्यातील व्यावसायिकांना सतत प्रोत्साहन देण्याची होती. परंतु, आता प्रसारमाध्यम हे फारच मोठ्या संकटात आहे. ज्या हेतुने परिषदेची स्थापना झाली होती तो सफल होत नाही आणि मला मी माध्यमाच्या स्वातंत्र्यासाठी काही उल्लेखनीय काम करत नाही याची जाणीव झालेली आहे. गुप्ता हे एक्स्प्रेस समुहाशी संबंधित आहेत.
गुप्ता यांनी पीसीआय ही प्रसारमाध्यमासाठी पूर्णपणे प्रतिनिधित्व करणारी संस्था नव्हती, असाही दावा केला. या परिस्थितीत प्रसारमाध्यम आणि त्यातील लोक हे ज्या परिस्थितीला तोंड देत आहेत त्यातून आम्ही कसे बाहेर येणार. हे आमच्यासाठी मोठेच आव्हान
आहे.
मी राजीनामा दिला कारण मी व्यक्तीश: आणि सामुहिकरित्या काम करण्यास सदस्य या नात्याने समर्थ नाही, असे बी. आर. गुप्ता म्हणाले.
प्रसारमाध्यमांत वेतनात झालेली कपात आणि अनेकांना गमवाव्या लागलेल्या नोकऱ्यांचा उल्लेख करून गुप्ता म्हणाले, हे दोन्ही घटक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्यायासाठी लढत आहेत.
पीसीआयचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. के. प्रसाद यांना संपर्क साधला असता गुप्ता यांचा राजीनामा अजून स्वीकारला गेलेला नाही, असे त्यांनी सांगितले.