निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव यांचे कॅनडात अपघातात निधन
By admin | Published: May 13, 2016 01:37 PM2016-05-13T13:37:05+5:302016-05-13T14:12:01+5:30
संत निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचे शुक्रवारी कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात कार अपघतात निधन झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि., १३ - संत निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचे शुक्रवारी कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात कार अपघतात निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. २३ फेब्रुवारी १९५४ रोजी त्यांचा दिल्लीत जन्म झाला होता. संत निरंकारी संप्रदायाचे भारतात लाखो अनुयायी आहेत. बाबा हरदेव यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे.
देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात बाबा हरदेव सिंह यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. हरदेव सिंह यांच्या वडिलांच्या हत्येनंतर १९८० मध्ये हरदेव सिंह निरंकारी संप्रदायाचे सर्वेसर्वा झाले.बाबा बटू सिंह यांनी १९२९ मध्ये संत निरंकारी मंडळाची स्थापना केली होती.
दिल्लीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९७१ मध्ये ते निरंकारी सेवा दलाचे प्राथमिक सदस्य झाले. जगभरातील २७ देशांमध्ये सध्या हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथाच्या १०० हून अधिक शाखा आहेत. त्यांच्या अपघाती जाण्याने जगभरातील त्यांच्या अनुयायांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बाबा हरदेव यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी लोकांसाठी भरपूर कार्य केले आहे असे भाजप नेते शहानवाझ हुसेन म्हणाले.
Baba Hardev Singh's demise is a loss to the nation. He was doing a lot of service for the people. I have personally seen his 'Samagams'.
— Shahnawaz Hussain (@ShahnawazBJP) May 13, 2016