निरंकारी संप्रदाय बुडाला शोकसागरात बाबा हरदेव सिंह ब्रšालीन : प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली

By admin | Published: May 13, 2016 10:35 PM2016-05-13T22:35:30+5:302016-05-13T22:35:30+5:30

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

Baba Hardev Singh Brillen: Tribute to the Prayer and the Congregation | निरंकारी संप्रदाय बुडाला शोकसागरात बाबा हरदेव सिंह ब्रšालीन : प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली

निरंकारी संप्रदाय बुडाला शोकसागरात बाबा हरदेव सिंह ब्रšालीन : प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली

Next
गाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या बाबा हरदेव सिंह यांचे कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जात असताना कारचा अपघात होऊन निधन झाले. हे वृत्त शहरात कळताच सर्वांना दु:ख अनावर झाले. त्यावेळी शिरसोली रस्त्यावरील संत निरंकारी सत्संग भवनाकडे सर्वांची पावले वळली. त्या ठिकाणी ४०० ते ५०० अनुयायांनी एकत्र येत प्रार्थना केली. तसेच रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान शोकसभा झाली.
सध्या जिल्‘ात हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथाच्या आठ शाखा असून जिल्हाभरात १० हजार अनुयायी आहे. या सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नऊ वर्षांपूर्वी जळगावात सत्संग...
२००७ मध्ये शहरातील आयएमआर महाविद्यालयाच्या प्रांगणात बाबा हरदेव सिंह यांचा एक दिवसाचा भव्य सत्संग झाला होता. त्या निमित्त ते जळगावात येऊन गेल्याची आठवण असल्याचे अनुयायांनी सांगितले. तसेच बाबांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही घडू शकलो, असे सांगून अनेकांना बोलताना दु:ख अनावर झाले व त्यांना आश्रू रोखता आले नाही.

अंत्यदर्शनासाठी भक्त जाणार....
संप्रदायाचे मुख्यालय दिल्लीत असून बाबांचा मृतदेह तेथे कधी आणतात हे अजून नक्की नाही. बाबांच्या अंत्यदर्शनाची हजारो भक्तांना ओढ लागली असली तरी जगभरातून भक्त येणार असल्याने दिल्लीत एवढी व्यवस्था शक्य नाही, त्यामुळे मोजकेच भक्त जिल्‘ातून जातील, असे सांगण्यात आले.

बाबा जगाचे मालक होते. ते ज्ञान देऊन गेले. त्यांच्यामुळेच संसार सुधारला गेला. संपूर्ण संप्रदायावर दु:ख कोसळले आहे.
रमेश आहुजा, जिल्हा संयोजक.

बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. त्यांनी सर्वांना एकतेचा संदेश दिला. ते आम्ही कधीही विसरू शकत नाही.
-सुशील राका.

बाबांनी सदैव मानवतेसाठी काम केले. त्यांच्या जाण्याने मानव जातीचे नुकसान झाले आहे. ते कधीही भरुन निघणार नाही.
- राजकुमार वाणी, ज्ञान प्रचारक.


निरंकारी संप्रदाय परिवारावर दु:ख कोसळले आहे. बाबांनी जीवनाचा उद्देश शिकविला. ते शरीराने जरी गेले असले तरी त्यांचा संदेश सदैव आमच्यात राहील.
- विलास पाटील, सेवादल संघटन

Web Title: Baba Hardev Singh Brillen: Tribute to the Prayer and the Congregation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.