Baba Ka Dhaba: "गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही..."; बाबांनी मागितली यूट्यूबरची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 05:20 PM2021-06-12T17:20:52+5:302021-06-12T17:22:46+5:30

'बाबा का ढाबा' चलवणारे कांता प्रसाद आता पुन्हा आपल्या जुन्याच ढाब्यावर परतले आहेत. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

Baba ka dhaba Baba's apologies from gaurav wasan video goes viral | Baba Ka Dhaba: "गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही..."; बाबांनी मागितली यूट्यूबरची माफी

Baba Ka Dhaba: "गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही..."; बाबांनी मागितली यूट्यूबरची माफी

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या वर्षी 'बाबा का ढाबा' चागंलाच चर्चेचा विषय होता. आता पुन्हा तो चर्चेत आला आहे. 'बाबा का ढाबा' चलवणारे कांता प्रसाद आता पुन्हा आपल्या जुन्याच ढाब्यावर परतले आहेत. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते यूट्यूबर गौरव वासनला माफी मागत आहेत. गेल्या वर्षी गौरवच्या व्हिडिओनंतरच 'बाबा का ढाबा' चर्चेत आला होता. (Baba ka dhaba Baba's apologies from gaurav wasan video goes viral)

आता काय म्हणतायत बाबा? 
बाबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते म्हणत आहेत, की ‘गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही कधी त्याला चोर म्हटले आहे. आमच्याकडून एक चूक झाली आहे, यासाठी आम्ही क्षमा मागतो आणि जनतेला म्हणत आहोत, की जर काही चूक असेल तर आम्हाला माफ करा.’

यापूर्वी 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी यूट्यूबर गौरव वासनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पैशांची फसवणूक केल्याचा आरोप करत ही तक्रार करण्यात आली होती.

बाबांचा हा व्हिडिओ पाहून यूझर्सदेखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरने लिहिले आहे, ‘व्हिडिओग्राफर अडकला आता याची वेळ’, एका यूझरने लिलिहे आहे, ‘काही दिवसांनी म्हणेल, मी म्हणालोच नव्हतो व्हिडिओ तयार कर... अशा विविध प्रकारच्या कमेंट युझर्स करत आहेत. 

तीन महिन्यांतच बंद झाला बाबांचा व्यवसाय -
बाबानी जो नवीन व्यवसाय सुरु केला होता, तो तीन महिन्यांतच बंद झाला. यामध्ये त्यांनी 5 लाख रुपये गुंतविले होते, काही कर्मचारी नोकरीवर ठेवले होते. भाडे 35000 रुपये, वीज पाण्यासाठी 15000 रुपये खर्च होत होते. मात्र, विक्री 40000 हून अधिक होत नव्हती. यामुळे नुकसानीत होतो, असे बाबा यांनी सांगितले.

Web Title: Baba ka dhaba Baba's apologies from gaurav wasan video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.