दीपक भारद्वाज हत्येप्रकरणी बाबा प्रतिभानंद यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:26 AM2017-09-18T05:26:48+5:302017-09-18T05:26:54+5:30

बसपा नेते तथा व्यावसायिक दीपक भारद्वाज यांच्या २0१३ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी स्वयंघोषित बाबा प्रतिभानंद याला गाझियाबाद पोलिसांनी शनिवारी अटक केली. या प्रकरणात बाबा प्रतिभानंद हा दिल्ली पोलिसांना हवा होता.

Baba Pratibhanand arrested for Deepak Bharadwaj murder | दीपक भारद्वाज हत्येप्रकरणी बाबा प्रतिभानंद यास अटक

दीपक भारद्वाज हत्येप्रकरणी बाबा प्रतिभानंद यास अटक

googlenewsNext


नवी दिल्ली : बसपा नेते तथा व्यावसायिक दीपक भारद्वाज यांच्या २0१३ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी स्वयंघोषित बाबा प्रतिभानंद याला गाझियाबाद पोलिसांनी शनिवारी अटक केली. या प्रकरणात बाबा प्रतिभानंद हा दिल्ली पोलिसांना हवा होता.
पोलिसांनी सांगितले की, २00९ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारद्वाज हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार होते. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात भारद्वाज यांनी ६00 कोटींची मालमत्ता घोषित केली होती. भारद्वाज यांच्या हत्येसाठी बाबा प्रतिभानंद याने सुपारी घेतली होती. नंतर त्याने गुंडांना सुपारी देऊन भारद्वाज याची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी सांगितले की, मच्छिंद्रनाथ ऊर्फ प्रतिभानंद हा मूळचा बीडचा आहे. प्रतिभानंद हा लहानपणीच घरातून पळून गेला होता. दिल्लीत आल्यानंतर तो बाबा बनला. त्याला स्वत:चा आश्रम बांधण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी त्याने हत्येचे हे उद्योग केले. त्याने हत्येसाठी ५ कोटी रुपये मागितले होते. त्यातील २ कोटी वाचवून हरिद्वारला स्वत:चा आश्रम बांधण्याची त्याची योजना होती, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक (शहर) आकाश तोमर यांनी सांगितले की, प्रतिभानंद याला गाझियाबाद जंक्शनवर अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारद्वाज यांच्या हत्येपासून तो बेपत्ता होता. भारद्वाज यांच्या हत्येसाठी त्याने शूटर्सची व्यवस्था केली होती. त्याला पकडून देण्यासाठी १ लाखाचे पारितोषिक घोषित करण्यात आले होते. त्याला लवकरच दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल.
भारतात अलीकडे वादग्रस्त बाबांना अटक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आखाडा परिषदेने १४ भोंदू बाबांची एक यादी नुकतीच जाहीर केली आहे.
>फार्म हाऊसमध्ये घातल्या होत्या गोळ्या
पोलिसांनी सांगितले की, भारद्वाज यांच्या हत्येची सुपारी त्यांचा धाकटा मुलगा नितेश यानेच बाबा प्रतिभानंद याला दिली होती. भारद्वाज यांनी नितेशला संपत्तीत वाटा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोघांत वाद होता. बाबाने राणा ऊर्फ मोनू आणि सुनील मान या दोन भाडोत्री मारेकºयांची व्यवस्था करून दिली. २६ मार्च २0१३ रोजी मारेकºयांनी भारद्वाज यांना दक्षिण दिल्लीच्या राजकोरी येथील त्यांच्याच ‘नितेश कुंज’ नामक फार्म हाऊसमध्ये गोळ्या घालून ठार मारले. हे फार्म हाऊस ३५ एकरवर आहे.

Web Title: Baba Pratibhanand arrested for Deepak Bharadwaj murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.