बाबा राम रहिमला जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 11:27 PM2018-10-05T23:27:38+5:302018-10-05T23:30:19+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. सच्चा सौदा येथे 400 साधुंना नपूंसक बनविण्यात आल्याप्रकरणी राम रहिम यांच्यावर खटला सुरू आहे
पंचकुला - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. सच्चा सौदा येथे 400 साधुंना नपूंसक बनविण्यात आल्याप्रकरणी राम रहिम यांच्यावर खटला सुरू आहे. याप्रकरणी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी, त्यास जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, बलात्कारप्रकरणी दोषी असल्याने राम रहिम अद्यापही तुरुंगातच राहणार आहे.
पंचकूला येथील डेरा सच्चा सौदा येथे 400 साधूंना नपूंसक बनविण्यात आल्याचा आरोप गुरमीत राम रहिमवरआहे. याप्रकरणी गुरमीत राम रहीम, डॉ. मोहिंद्र इंसां आणि डॉक्टर पीआर नैन पर यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. त्यानुसार आरोपींवर आयपीसीच्या कलम 326, 417, 506 आणि 120 बी अन्वये आरोप निश्चित झाले असून त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी मोहिंद्र इंसां आणि डॉ. पीआर नैन अगोदरच तुरुंगात आहेत.