बाबा रामदेव, बालकृष्ण यांनी पुन्हा मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 05:46 AM2024-04-10T05:46:04+5:302024-04-10T05:46:43+5:30
आपल्या चुकीविषयी खेद व्यक्त करीत पुन्हा असे घडणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भ्रामक जाहिराती केल्याने पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टासमोर पुन्हा माफी मागितली.
आपल्या चुकीविषयी खेद व्यक्त करीत पुन्हा असे घडणार नाही, अशी ग्वाही देणारे प्रतिज्ञापत्र बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी न्या. हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या पीठापुढे मंगळवारी सादर केले. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी पतंजलीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे.
आज पुन्हा सुनावणी
बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांची माफी म्हणजे निव्वळ शब्दछल असल्याचे सांगून कोर्टाने ती स्वीकारण्यास नकार दिला आणि दोघांनाही १० एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी बुधवारी होणाऱ्या सुनावणीपूर्वी बिनशर्त माफीनामा सादर केला आहे.