Baba Ramdev: “भारत सरकारला जे संशोधन जमलं नाही, ते पतंजलीने करून दाखवलं”: बाबा रामदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 02:14 PM2021-07-13T14:14:44+5:302021-07-13T14:17:07+5:30
Baba Ramdev: आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
हरिद्वार: अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) चर्चेत आहेत. पतंजली योगपीठ (Patanjali Yogpeeth) येथील एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी पतंजली कंपनीची ध्येयधोरणे, आगामी वाटचाल, यशस्वी टप्पे यांविषयी माहिती दिली. भारत सरकारला जे संशोधन आतापर्यंत केलेले नाही, ते पतंजलीत करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारताची प्रेरणा घेऊनच पतंजलीची वाटचाल सुरू आहे. पतंजली ब्रँड नसून, आंदोलन असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. (baba ramdev claims that patanjali challenged the monopoly of foreign companies)
उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार
बाबा रामदेव यांनी पुढे बोलताना सांगितले की, परदेशी कंपन्यांच्या एकाधिकारशाही, मक्तेदारीला पतंजलीने आव्हान दिले आहे. देशाच्या समृद्धीसाठी पतंजलीने मोठे योगदान दिले असून, भविष्यात एक विद्यापीठ सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत पतंजलीने ५ लाख जणांना नोकऱ्या दिल्या असून, आगामी ५ वर्षांत आणखी ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे बाबा रामदेव यांनी नमूद केले.
Live - सामूहिक समृद्धि और सामूहिक सेवा द्वारा "अर्थ से परमार्थ" के यज्ञ में आमजन की हिस्सेदारी पर विशेष https://t.co/8ap4QaMTJ2
— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) July 13, 2021
संशोधनावर आधारित १०० औषधे
आम्ही दोन व्यक्तींना योग, योगासने शिकवण्यास सुरुवात केली होता. आता २०० देशातील १०० ते २०० कोटी जनसंख्या सरासरी दररोज योगासने करतात, असेही बाबा रामदेव यांनी नमूद केले. पतंजलीमध्ये संशोधनावर अधिक भर दिला जातो. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त औषधे सखोल आणि व्यापक संशोधनानंतर बाजारात सादर करण्यात आली आहेत. पतंजलीमध्ये ५०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ काम करतात. पतंजलीच्या सेवांवर आम्हांला अभिमान आहे. आताच्या घडीला समाजातील एक मोठा वर्ग पतंजलीशी जोडला गेला आहे, असे सांगत पतंजलीच्या औषधांमुळे असाध्य रोग, आजार बरे झाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी यावेळी बोलताना केला आहे.
BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम
संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर
भविष्यात पतंजलीचा संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर भर राहील. यासह कृषी क्षेत्रातही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच पतंजली ग्रुपचा टर्नओव्हर २५ हजार कोटी रुपये असून, आगामी कालावधीत तो २ हजार २५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले आहे.