"नमाज अदा करा अन् हिंदू मुलींना...", बाबा रामदेव यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 09:40 AM2023-02-03T09:40:37+5:302023-02-03T09:42:22+5:30

Baba Ramdev Controversial Statement : बाबा रामदेव यांनी बाडमेर येथील एका धार्मिक सभेत इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त विधान केले आहे.

Baba Ramdev Makes Controversial Remark on Muslims in Rajasthan`s Barmer | "नमाज अदा करा अन् हिंदू मुलींना...", बाबा रामदेव यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

"नमाज अदा करा अन् हिंदू मुलींना...", बाबा रामदेव यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

googlenewsNext

बाडमेर : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev)  यांनी राजस्थानच्या बाडमेरमध्ये वादग्रस्त विधान केले आहे. बाबा रामदेव यांनी बाडमेर येथील एका धार्मिक सभेत इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम दहशतवादी असला तरी तो नमाज नक्कीच अदा करतो. अशा लोकांना इस्लामचा अर्थ फक्त नमाजपर्यंत समजतो. पाच वेळा नमाज पठण करा आणि तुम्हाला जे काही पाप करायचे आहे ते करा. हिंदू मुलींना उचलून न्या किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी बनून तुमच्या मनात येईल ते करा. पण, हिंदू धर्मात असे नाही, असे बाबा रामदेव म्हणाले.

ख्रिश्चन धर्माबाबतही बाबा रामदेव यांनी वादग्रस्त विधान केले आहे. चर्चमध्ये जा आणि मेणबत्ती लावा आणि येशू ख्रिस्तासमोर उभे राहा. सर्व पापे धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असे केले जात नाही. मी कोणावरही टीका करत नाही, पण हे लोक असेच आहेत. काही जण संपूर्ण जगाला इस्लाममध्ये धर्मांतरित करत आहेत, तर काहींना ते ख्रिश्चनमध्ये धर्मांतर करत आहेत, असे बाबा रामदेव म्हणाले. 

याचबरोबर, बाबा रामदेव म्हणाले, सनातन धर्म हा इतर धर्मांसारखा नाही. ब्रह्म मुहूर्तावर उठावे, सकाळी देवाचे नामस्मरण करावे व योगासने करावीत. हिंदू धर्म आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीने कसे जगायचे हे शिकवतो. सदाचारी वागणूक असावी. आपले वर्तनही असेच असावे. लोकांनी हिंसा आणि खोटेपणापासून दूर राहावे. माणसाने भांडणे, पाप आणि गुन्हेगारी यापासून दूर राहावे, अशी शिकवण हिंदू धर्म देतो, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

दरम्यान, याआधी बाबा रामदेव यांनी महाराष्ट्रातील ठाण्यात आयोजित एका योग कार्यक्रमामध्ये महिलांबद्दलच्या वादग्रस्त केले होते. त्यावेळी, महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त बाबा रामदेव केले होते. यावेळी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. त्यावरून वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर बाबा रामदेव यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.

Web Title: Baba Ramdev Makes Controversial Remark on Muslims in Rajasthan`s Barmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.