अमित शहांनी कमी केले ३० किलो वजन; बाबा रामदेव यांनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 05:59 PM2023-03-31T17:59:57+5:302023-03-31T18:11:26+5:30
भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह आज उत्तराखंड येथील पतंजली योगपीठात हजेरी लावली.
भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी आज उत्तराखंड येथील पतंजली योगपीठात हजेरी लावली. केंद्रीय मंत्री अमित शाह वयाच्या ५८ व्या वर्षीही देशभरात दररोज दौरे करतात, यामुळे त्यांच्या फिटनेसची चर्चा होतं असते. आज पतंजली योगपीठातील एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी अमित शाह यांच्या फिटनेस संदर्भातील किस्से सांगितले.
'केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जवळपास ३० किलो वजन कमी केले आहे, याचा मला खूप आनंद आहे', असं बाबा रामदेव म्हणाले. अमित शाह पतंजली योगपीठाच्या दुसऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवात उपस्थित होते. बाबा रामदेव यांनी स्टेजवरून अमित शहा यांचे कौतुक केले. बाबा रामदेव म्हणाले की,'वैयक्तिकरित्या योग आणि आयुर्वेदाची पूजा करून अमित शाह यांनी सुमारे तीस किलो वजन कमी केले आहे, याचा मला खूप आनंद आहे.
सरेंडर करू नको, पाकिस्तानात पळून जा, पंजाबमधील खलिस्तानवादी खासदाराने अमृतपालला दिला सल्ला
बाबा रामदेव पुढे म्हणाले, 'सनातनच्या अभिमानाचा सर्वात मोठा योद्धा आणि गुलामगिरीच्या खुणा नष्ट करणारा कोणी असेल तर आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे.'जेव्हा बाबा रामदेव अमित शाह यांच्या फिटनेसचे कौतुक करत होते, तेव्हा शाह रामदेव बाबांच्या शेजारी उभे राहून हसत होते. यानंतर बाबा रामदेव यांनी अमित शाह यांच्या नातवाचा एक किस्साही सांगितला.
व्यासपीठावरून अमित शाह यांच्या नातवाचा किस्सा सांगताना बाबा रामदेव म्हणाले, 'ते वेद, व्याकरण, उपनिषद, गीता त्यांची नात रुद्रीला शिकवतात, मला आमच्या मोठ्या भावात अनंतकाळचे जीवन आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. उत्तराखंडमध्ये पोहोचलेल्या अमित शाह यांनी आणखी एका कार्यक्रमात राम मंदिराबाबत मोठा खुलासा केला आहे. राम मंदिराला भव्य स्वरूप देण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे शाह यांनी कार्यक्रमात सांगितले.