IMA Vs Ramdev: “माझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाही, तर...”; बाबा रामदेव यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:20 PM2021-05-31T22:20:37+5:302021-05-31T22:21:47+5:30
IMA Vs Ramdev: योगगुरू बाबा रामदेव यांनी ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे मात्र अॅलोपॅथी आणि आयुर्वेद या उपचार पद्धतीवरून देशात नवा वाद रंगताना पाहायला मिळत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी केलेल्या आरोप आणि विधानानंतर १ जून रोजी संपूर्ण देशात काळा दिवस पाळण्याचे फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया जाहीर केले आहे. यातच आता बाबा रामदेव यांनी देशातील सर्व डॉक्टरांना प्रणाम करतो. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी हजारो रुग्णांचे प्राण वाचवले, असे म्हटत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (baba ramdev says i am not against ima and doctors and have already taken my words back)
IMA आणि बाबा रामदेव यांच्यातील वाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे. योगगुरु रामदेव यांनी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकास्त्र सोडले. या टीकेनंतर आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत याची दखल घेण्यास सांगितले असून, बाबा रामदेव यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, यानंतर माझे वक्तव्य मागे घेत आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत डॉक्टरांनी रुग्णांची सेवा केली आहे. आपल्या त्यागातून रुग्णांना जीवनदान दिले आहे. त्या सर्व डॉक्टरांना मी प्रणाम करतो, असे सांगत ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हमारा अभियान ऐलोपैथी व श्रेष्ठ डाक्टर्स के खिलाफ नहीं है हम इनका सम्मान करते हैं,उन ड्रग माफियाओं के खिलाफ है जो 2 ₹ की दवाई को 2000 ₹ तक बेचते हैं और गैरजरूरी आपरेशन व टेस्ट तथा अनावश्यक दवा का धंधा करते हैं।
— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) May 31, 2021
हम इस विवाद को खत्म करना चाहते हैं। pic.twitter.com/qvN51bOLDL
माझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाही
माझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाही. आयएमएविरोधात जाण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र आमचा या क्षेत्रातील माफियांना विरोध आहे. ते दोन रुपयांचं औषध दोन हजार रुपयांना विकत आहेत. तसेच आवश्यकता नसताना ऑपरेशन आणि चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच औषधांचा धंदा करतात. आम्ही हा वाद संपवू इच्छित आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू
अॅलोपॅथीत शस्त्रक्रिया आणि जीव वाचवण्याची औषधे
दुसऱ्या एका ट्विटमध्ये बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की, जर अॅलोपॅथीत शस्त्रक्रिया आणि जीव वाचवण्याची औषधं आहेत. तर ९८ टक्के आजारांना योग आणि आयुर्वेदमध्ये समाधान आहे. योग-आयुर्वेद यांना स्यूडो सायन्स आणि अल्टरनेटिव थेरपी बोलणं खिल्ली उडवण्यासारखं आहे. ही मानसिकता देश सहन करणार नाही, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.