संपूर्ण देश ख्रिश्चनमय करायचं षडयंत्र! ...म्हणून बाबा रामदेवांना केलं जातंय टार्गेट, आचार्य बालकृष्ण यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 02:26 PM2021-05-25T14:26:54+5:302021-05-25T14:27:30+5:30

बाबा रामदेव आपल्या एका वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल झाले आहेत. यामुळे मिडिया आणि सोशल मिडियावरही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आरोग्यमंत्रालयानेही बाबा रामदेव यांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे.

Baba Ramdev vs IMA controversy patanjali ceo slammed doctors for targeting swami ramdev | संपूर्ण देश ख्रिश्चनमय करायचं षडयंत्र! ...म्हणून बाबा रामदेवांना केलं जातंय टार्गेट, आचार्य बालकृष्ण यांचं वक्तव्य

संपूर्ण देश ख्रिश्चनमय करायचं षडयंत्र! ...म्हणून बाबा रामदेवांना केलं जातंय टार्गेट, आचार्य बालकृष्ण यांचं वक्तव्य

Next

नवी दिल्ली - पतंजली उद्योगाचे सह संस्थापक आणि योग गुरू बाबा रामदेव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात सापडत आहेत. देशात कोरोना महामारीच्या थैमानात शेकडो डॉक्टर्ससह लाखो लोकांचा जीव गेला आहे. डॉक्टर लोक दिवस-रात्र कोरोना संक्रमितांवर उपचार करत आहेत. अशातच, बाबा रामदेवांचे काही असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात ते अॅलोपॅथी आणि डॉक्टरांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. (Baba Ramdev vs IMA controversy patanjali ceo slammed doctors for targeting swami ramdev)

बाबा रामदेव आपल्या एका वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल झाले आहेत. यामुळे मिडिया आणि सोशल मिडियावरही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आरोग्यमंत्रालयानेही बाबा रामदेव यांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर रामदेव यांनी आपले वक्तव्य तर मागे घेतले, पण वाद थांबण्याचे नाव नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून रामदेव यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. 

Baba Ramdev: आता रामदेव बाबांनी उडविली डॉक्टरांची खिल्ली; बोलले, "डिग्रीशिवाय मी बनलो डॉक्टर"

आयएमएचे म्हणणे आहे, की बाबा रामदेव यांच्यावर महामारी अॅक्टअंतर्गत गुंन्हा दाखल व्हायला हवा. तर आपले गुरू रामदेव आणि पतंजली उद्योगावरील होत असलेला लोकांचा हल्ला पाहून आचार्य बालकृष्णदेखील मैदानात उतरले आहेत. बालकृष्ण यांनी म्हटले आहे, की रामदेव यांना टार्गेट करून योग आणि आयुर्वेद नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आचार्य बालकृष्ण यांनी आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयालाल यांचे एक कथित वक्तव्य सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात सम्हणण्यात आले आहे, की जयालाल हे रुग्णालयांत आणि शाळांमध्ये ख्रिश्चनिटीचा प्रचार करतात. 

आचार्य बालकृष्ण यांनी लिहिले आहे, की संपूर्ण देश क्रिश्चयानिटीत कन्व्हर्ट करण्याच्या षड्यंत्रांदर्गत, रामदेव यांना टार्गेट करून योग आणि आयुर्वेदाला बदनाम केले जात आहे. देशवासियांनो, आता तरी गाढ झोपेतून जागे व्हा, अन्यथा येणाऱ्या पिढ्या तुम्हाला क्षमा करणार नाहीत. 

ऐ चुप्प... डिबेट शोमध्ये मराठमोळ्या डॉ. लेलेंकडून बाबा रामदेव यांची बोलती बंद

बालकृष्ण यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. काही लोक बालकृष्ण यांच्या म्हणण्याचे समर्थन करत आहेत, तर काही लोक त्यांनाच सवाल करत आहेत. 

केवळ आयुर्वेदानेच अग्नीपरीक्षा का द्यावी? -

बाबजींकडून मोठी चूक -

Web Title: Baba Ramdev vs IMA controversy patanjali ceo slammed doctors for targeting swami ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.