बाबा रामदेव यांची 'दंगल', उतरले कुस्तीच्या आखाड्यात

By admin | Published: January 18, 2017 11:27 PM2017-01-18T23:27:05+5:302017-01-19T01:53:02+5:30

2008 मधील ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेता आंद्रे स्टॅडनिक याच्यासोबत योगगुरु रामदेव बाबा चक्क कुस्तीच्या आखाड्यात उतरले होते.

Baba Ramdev's 'Dangal', landed wrestling akhada | बाबा रामदेव यांची 'दंगल', उतरले कुस्तीच्या आखाड्यात

बाबा रामदेव यांची 'दंगल', उतरले कुस्तीच्या आखाड्यात

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 -  2008 मधील ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेता आंद्रे स्टॅडनिक याच्यासोबत योगगुरु रामदेव बाबा चक्क कुस्तीच्या आखाड्यात उतरले होते. यावेळी बाबा रामदेव यांनी आंद्रे स्टॅडनिकवर 12 गुणांनी मात केली.
प्रो रेसलिंग लीगच्या मुंबई महारथी - पंजाब रॉयल्स यांच्यातील दुस-या उपांत्य सामन्यादरम्यान हा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. यावेळी 2008 मधील ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेता आणि बीजिंगऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमारला हरवून अंतिम फेरीत धडक मारलेल्या आंद्रे स्टॅडनिकला बाबा रामदेव यांनी चितपट केले. या लढतीत बाबा रामदेव यांनी आंद्रे स्टॅडनिकवर 12 गुणांनी मात केली. 
जर बाबा रामदेव क्रीडा क्षेत्रात असते तर, ते भारताचे सर्वोत्तम मल्ल ठरले असते, अशी प्रतिक्रीया आंद्रेने यावेळी दिली. दरम्यान, ही लढत केवळ प्रदर्शनीय असल्याने आंद्रेने कोणताही अतिरिक्त प्रतिकार न करताना बाबा रामदेव यांना आपले डावपेच करण्याची संधी दिली. मात्र, बाबा रामदेव यांनी दाखवलेल्या कुस्ती कौशल्याने उपस्थिती प्रेक्षकांची मने जिंकली.

Web Title: Baba Ramdev's 'Dangal', landed wrestling akhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.