शेअर बाजारापासून दूर राहणार बाबा रामदेव यांची पतंजली संस्था
By admin | Published: February 2, 2016 02:01 PM2016-02-02T14:01:37+5:302016-02-02T15:01:11+5:30
देशातील जनतेला योगा शिकवत हजारो कोटींच्या उद्योगाचे साम्राज्य उभे करणारे बाबा रामदेव यांची पतंजली संस्था मात्र शेअर बाजारात उतरणार नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - देशातील जनतेला योगा शिकवत हजारो कोटींच्या उद्योगाचे साम्राज्य उभे करणारे बाबा रामदेव यांची पतंजली संस्था मात्र शेअर बाजारात उतरणार नाही. 'पतंजली'चा उद्योग विस्तारत असल्यामुळे घाबरलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याविरोधात षडयंत्र रचले असून आपण कायदेशीर लढाईद्वारे त्यांना प्रत्युत्तर देऊ, असेही रामदेव यांनी स्पष्ट केले.
'पतंजली' संस्थेच्या अनेक उत्पादनांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असून त्यांची उत्पादने वादाचा भोव-यात सापडली आहेत. मात्र बाबा रामदेव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून पतंजलीच्या तुपात कोणतीही भेसळ नसल्याचे स्पष्ट केले. आपली सर्व उत्पादने संपूर्णपणे भेसळरहीत असल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या संस्थेची प्रगती रोखण्यासाठी इतर कंपन्या आपल्याला बदनाम करत असून लोकांना आर्थिक प्रलोभने दाखवून सोशल-मीडियावक आपल्या विरुद्ध अभियान चालवले जात असल्याचा आरोपही रामदेव यांनी केला. ' कोणीही आमच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लोकांचे स्वास्थ्य, प्रकृती बिघडू देणार नाही' असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला बदनाम करणा-यांना आम्ही कायदेशीर कारवाईद्वाके उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.