संपत्तीसाठी भररस्त्यात त्यांनी उतरवले बापाचे कपडे

By admin | Published: July 13, 2017 07:34 PM2017-07-13T19:34:13+5:302017-07-13T19:34:13+5:30

कर्नाटकच्या बगालकोटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संपत्तीसाठी मुलांनी बापाला भररस्त्यात मारहाण करत अर्धनग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Baba's clothes were overflowing with wealth | संपत्तीसाठी भररस्त्यात त्यांनी उतरवले बापाचे कपडे

संपत्तीसाठी भररस्त्यात त्यांनी उतरवले बापाचे कपडे

Next

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 13 - कर्नाटकच्या बगालकोटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संपत्तीसाठी मुलांनी बापाला भररस्त्यात मारहाण करत अर्धनग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टाईम्स नाऊने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन जण एका 75 वर्षाच्या वयोवृद्धाला मारत असल्याचे दिसत आहे. टाईम्स नाऊने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 75 वर्ष वयोवृद्धोच्या छातीवर बसला आहे. तर दुसरा एक व्यक्ती त्याचे पाय बांधत असतानाचे भयावह चित्र दिसतेय. याचवेळी त्या परिसरात असलेले अजूबाजूचे लाक त्या दृष्याकडे पाहत आहेत. पण त्या गर्दीतील एकजणही त्या वृद्धव्यक्तीच्या मदतीला समोर आले नाही.
75 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती आपल्या मुलाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसतेय.
माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही मुला वडिलांच्या संपत्तीची वाटणी पाहिजे होती. पण वडिलाने त्यास नकार दिल्यामुळे चवताळलेल्या मुलांने भररसत्यात बापावरच हल्ला करत त्याला अर्धनगन्न केले. सोशल मीडियावर या प्रकरणाची घोर निंदा केली जात आहे.

Web Title: Baba's clothes were overflowing with wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.