रांगोळीतून साकारली बाबासाहेबांची विश्वविक्रमी प्रतिमा... १७ हजार चौरस फूट : विश्वविक्रमासाठी नामांकन पाठविणार
By admin | Published: April 14, 2016 12:53 AM2016-04-14T00:53:52+5:302016-04-14T00:53:52+5:30
जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शहरातील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्यावतीनेशिवतीर्थ मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १७ हजार चौरस फूट विश्वविक्रमी रांगोळी बुधवारी साकारण्यात आली. विशेष म्हणजे शरद विश्वासराव भालेराव या एकट्या तरुणाने पाच तास ४१ मिनिटांमध्ये ही रांगोळी साकारली. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी आयोजकांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
Next
ज गाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शहरातील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्यावतीनेशिवतीर्थ मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १७ हजार चौरस फूट विश्वविक्रमी रांगोळी बुधवारी साकारण्यात आली. विशेष म्हणजे शरद विश्वासराव भालेराव या एकट्या तरुणाने पाच तास ४१ मिनिटांमध्ये ही रांगोळी साकारली. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी आयोजकांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानच्यावतिने यंदा शहरात प्रथमच विश्वविक्रमी रांगोळी काढण्याचा उपक्रम राबविला. या रांगोळीसाठी सकाळपासूनच तयारी करण्यात आली. यामध्ये प्रथम १७ हजार चौरस फूट जागेमध्ये दोर्यांच्या साहाय्याने चौकटी तयार करण्यात येऊन त्यामध्ये प्रथम शरद भालेराव यांनी रेखाचित्र तयार केले. त्यानंतर त्यामध्ये चार पर्यावरणपूरक रंगांचा वापर करुन पाच तास ४१ मिनिटांमध्ये ही रांगोळी पूर्ण केली. यासाठी दीड टन रांगोळीचा वापर करण्यात आला. या १७ हजार चौरस फूट परिसरात इतर कोणालाही प्रवेश नव्हता. कमी वेळ व आकार मोठा हा या रांगोळीचा विश्वविक्रम असून या पूर्वी सोलापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच १२ तासांमध्ये १५ हजार चौरस फूट रांगोळी काढण्यात आली होती. त्यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नामांकन पाठविणार असल्याचे प्रतिष्ठानच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक जोशी यांनी सांगितले. परिक्षक म्हणून ॲड. के.जहांगिर, एस.के. नारखेडे, जे.एम.अग्रवाल, नितीन इंचोले यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. यासाठी राजेंद्र भालेराव हरीशचंद्र सोनवणे, जयंत वाघ, दीपक जोशी, किशोर सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. मान्यवरांची भेट...ही महाकाय रांगोळी पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे, मनपा उपायुक्त प्रदीप जगताप, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, नगरसेवक अनंज जोशी, कैलास सोनवणे, जितेंद्र मुंदडा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदींनी भेट दिली.