बाबरीप्रकरणी आडवाणींसह २० जणांना नोटीस
By Admin | Published: April 1, 2015 04:20 AM2015-04-01T04:20:06+5:302015-04-01T04:27:50+5:30
बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह
नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह २० नेत्यांविरुद्ध नोटीस बजावली. त्यात औरंगाबादेतील मोरेश्वर सावे अणि ठाण्यातील सतीश प्रधान यांचाही समावेश आहे.
सर्वांविरुद्धचा गुन्हेगारी कटाचा आरोप रद्द केल्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने भाजपा आणि संघाच्या नेत्यांसोबतच सीबीआयलाही नोटीस जारी केली. केंद्रात सत्तापालट झाल्यामुळे सीबीआय आपली भूमिका सौम्य करण्याची शक्यता आहे, असा आरोप हाजी महबूब अहमद यांनी या याचिकेत केला आहे.
बाबरी मशिदीप्रकरणी आडवाणी आणि अन्य २० जणांविरुद्धचा गुन्हेगारी कटाचा आरोप रद्द करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.