बाबरी विध्वंस प्रकरण : CBI न्यायालयात आडवाणींनी नोंदवला जबाब, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 07:24 PM2020-07-24T19:24:50+5:302020-07-24T19:50:49+5:30
यापूर्वी गुरुवारी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murali Manohar Joshi) यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला होता.
लखनौ -भाजपाचे वरिष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान तथा माजी गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) यांनी शुक्रवारी बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी (Babri Demolition Case) सीबीआयच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने आपला जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी सीबीआयचे सर्व आरोप फेटाळून लावले.
आडवाणी यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे, की "मी निर्दोष आहे. मी कोणत्याही घटनेत सामील नव्हतो. तत्कालीन केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मला अडकवण्यात आले आहे."
यापूर्वी गुरुवारी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murali Manohar Joshi) यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात आपला जबाब नोंदवला होता. त्यांनीही आपण निर्दोष असल्याचे म्हणत, घटनेच्या वेळी आपण घटनास्थळी नव्हतो, असे म्हटले आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकारण प्रेरित आहे. मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. याशिवाय जोशी यांनी, सीबीआयचे सर्व आरोप फेटाळून लावत साक्षिदारांची साक्षही खोटी असल्याचे म्हटेल आहे.
व्हिडिओमध्ये कशी झाली छेडछाड -
भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी न्यायालयाला सांगितले, की पुरावा म्हणून जी व्हिडिओ कॅसेट सादर करण्यात आली आहे. त्यात छेडछाड करण्यात आलेली आहे. एवढेच नाही, तर ही कॅसेट योजनबद्ध पद्धतीने चौकशीत सामाविष्ठ करण्यात आली. याशिवाय, जोशी यांनी त्यावेळच्या वृत्त पत्रांतील बातम्यांचेही खंडन केले. तसेच वेळ आली, की आपण निर्दोष असल्याचे पुरावे सादर करून असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
सीबीआयने बाबरी विध्वंस प्रकरणात जोशी यांना तब्बल 1050 प्रश्न विचारले. जोशी यांचा जबाब नोंदवण्याचे काम सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत सुरू होते. आतापर्यंत बाबरीप्रकरणी 29 आरोपिंचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर