Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार

By बाळकृष्ण परब | Published: September 30, 2020 03:32 PM2020-09-30T15:32:39+5:302020-09-30T15:44:21+5:30

Babri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी निकाल देताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

Babri Masjid Demolition Verdict : Zafaryab Jilani said, will challenge the decision in the High Court | Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार

Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार

Next
ठळक मुद्देहा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे१९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहेकलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे

लखनौ - बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्यावर अखेर आज लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या निकालानंतर भाजपाच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी बाबरी मशीदच्या बाजूने असलेल्या मंडळींनी वरच्या न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे प्रसिद्ध वकील जफरयाब जिलानी यांनी सांगितले आहे.

लखनौमधील सीबीआय न्यायालयाने आज निकाल सुनावताना ३२ आरोपींना मुक्त केल्यानंतर निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले की, हा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे. १९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि प्रसारमाध्यमांतील लोकांनी या लोकांचे नाव घेतले होते. दरम्यान, लालकृष्ण अडवाणींसारखे अन्य नेते एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो अशा घोषणा द्यायचे
.
कलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे. आम्ही आता या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहोत, अशी माहिती जिलानी यांनी दिली.

बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींची आज न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी  माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे

Web Title: Babri Masjid Demolition Verdict : Zafaryab Jilani said, will challenge the decision in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.