बाबरी मस्जीद वहीं बनाएंगे - ओवेसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:42 PM2018-02-25T23:42:35+5:302018-02-25T23:42:35+5:30
राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूनेच होऊल व त्यानंतर उद््ध्वस्त झालेली बाबरी मशिद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल
नवी दिल्ली : राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूनेच होऊल व त्यानंतर उद््ध्वस्त झालेली बाबरी मशिद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल, असा विश्वास ‘आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन’चे (एआयएमआयएम) प्रमुख व खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी रविवारी येथे व्यक्त केला.
ओवेसी म्हणाले की, आमची मशिद तेथे आहे, होती व तेथेच राहील. सर्वोच्च न्यायालय आमच्या हाती निकाल देईल तेव्हा मशिद पुन्हा होती तेथेत बांधली जाईल. सर्वोच्च न्यायालय श्रद्धेच्या आधारे नव्हे तर पुराव्यांच्या आधारावरच निर्णय देईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
कोणाचेही नाव न घेता ओवेसी असेही म्हणाले की, हे लोक आम्हाला भीती घालत आहेत. आमच्या शरियतविरुद्ध ओरड करत आहेत. मशिद सोडून द्या, असे आम्हाला सांगत आहेत. पण काही झाले तरी आम्ही मशिद सोडणार नाही.