तृणमूलमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियोंचा भाजपविरोधात प्रचार करण्यास नकार, दिले 'हे' कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:58 PM2021-09-19T19:58:55+5:302021-09-19T20:00:55+5:30
Bhawanipur By election: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी नुकतंच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भवानीपूर:भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजपशी संबंध तोडल्यानंतर टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. पण, तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतरही बाबुल सुप्रियोंनीममता बॅनर्जींच्या बाजूने आणि भवानीपूरमध्ये भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला आहे.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो भाजपचे स्टार प्रचारक होते. परंतु, केंद्रीय मंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. टीएमसीमध्ये आल्यानंतर ते भवानीपूर ममता बॅनर्जींचा प्रचार करतील अशी आशा होती. पण, त्यांनी प्रकार करण्यास नकार दिला आहे.
प्रचार का करणार नाहीत ?
रविवारी दुपारी तृणमूल भवनात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना बाबुल सुप्रियो म्हणाले की, 'भवानीपुरमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करण्याची माझी इच्छा नाही. भवानीपूरमधील भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल माझ्या वकील होत्या. त्या एक लढवय्या महिला आहेत. माझ्या बाजुने त्यांनी अनेक खटले लढवले आहेत. मला त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा नाही.'