भाजपाध्यक्ष जेपी नड्डांना भेटताच बाबुल सुप्रियोंचा निर्णय बदलला, राजकारण सोडणार पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:27 PM2021-08-02T21:27:35+5:302021-08-02T21:28:01+5:30

लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात ठेवले होते

Babul Supriyo's decision changed, Leaving politics but continue as MP in delhi | भाजपाध्यक्ष जेपी नड्डांना भेटताच बाबुल सुप्रियोंचा निर्णय बदलला, राजकारण सोडणार पण...

भाजपाध्यक्ष जेपी नड्डांना भेटताच बाबुल सुप्रियोंचा निर्णय बदलला, राजकारण सोडणार पण...

googlenewsNext
ठळक मुद्देलोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात ठेवले होते

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे मोठे नाव असलेले भाजपाचेखासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी राजकारणाला रामराम करण्याची घोषणा केली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी मी राजकारणात केवळ समाज सेवेसाठी आलो होतो. आता मी माझा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणत राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याची घोषणा त्यांनी केली. मात्र, आज भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आहे. 

लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात ठेवले होते. मात्र, आता राजीनामा न देता खासदारकी कायम ठेवण्याच्या निर्मयावर त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे, बाबुल सुप्रियो हे राजकारणात नसतील पण खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करतील. 

बाबुल हे पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर खासदार बनून निवडून आले आहेत. त्यामुळे, आसनसोल येथील नागरिकांनी दिलेल्या जबाबदारीचे कर्तव्यनिष्ठेने पालन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी कुठल्याही पक्षाच्या सक्रीय राजकारणात असणार नाही. तसेच, मला खासदार म्हणून दिल्लीत मिळालेला बंगलाही मी खाली करणार आहे. तसेच, माझ्या सुरक्षा रक्षकांनाही लवकरच माझ्यापासून नोकरीमुक्त करणार असल्याचे सुप्रियो यांनी सांगितलं. 

गेल्या काही दिवसांपासून बाबुल सुप्रियो यांची भाजपामध्ये कमी होत चाललेली भूमिका बरेच काही सांगून जात होती. बाबुल काहीतरी मोठा निर्णय घेतील असे बोलले जात होते. त्यावर बाबुल सुप्रियो यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. पक्षासोबत माझे काही मतभेद होते. निवडणुकीच्या आधीच ते साऱ्यांसमोर आले होते. पराभवाची मी जबाबदारी घेतो, परंतू त्यासाठी बाकीचे नेतेदेखील जबाबदार आहेत, असे सुप्रियो म्हणाले. 

पक्ष सोडण्याचा विचार बऱ्याच काळापासून

बाबुल यांनी म्हटले की, पक्ष सोडण्याचा विचार मी बऱ्याच काळापासून करत होतो. राजकारण सोडण्याचे आधीपासूनच मन बनविले होते. मात्र, जे पी नड्डा यांनी रोखल्यामुळे मी तो निर्णय मागे घेतला होता. आता काही नेत्यांबरोबर मतभेद वाढू लागले होते आणि वादही समोर येत होते, यामुळे मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बाबुल सुप्रियो यांनी सांगितले.
 

Web Title: Babul Supriyo's decision changed, Leaving politics but continue as MP in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.