"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:37 PM2024-10-03T15:37:57+5:302024-10-03T15:38:35+5:30
"देव इस्रायलला आणखी शक्ती देवो अन्...;
इस्रायल-इराण-लेबनॉन युद्धाची चर्चा आता हरियाणा विधानसभा निवडणुकीतही होऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी पलवलमधील एका रॅलीदरम्यान हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाहच्या खात्म्याचा उल्लेख करत, देवाकडे इस्रायलला आणखी शक्ती देण्याची प्रार्थना केली. हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातील आणि मामन खान हिंदूंना हाकलून देईल, असेही सरमा म्हणाले.
सरमा म्हणाले, 'काँग्रेसने संपूर्ण भारतात तुष्टीकरणाचे वातावरण निर्माण केले आहे. देशात काँग्रेसचे सरकार नसते तर 75 वर्षांपूर्वीच अयोध्येत राम मंदिर बांधले गेले असते. काँग्रेसने बाबराचे पाळला होता. आता बाबरची जागा राम लल्लांनी घेतली आहे, मात्र देशाच्या कानाकोपऱ्यात बाबर लपून बसले आहेत. या बाबरांना धक्के मारून देशाबाहेर काढायचे आहे. यासाठी भाजपला पुन्हा पुन्हा विजयी करायचे आहे.
काँग्रेस नेते मामन खान यांचा उल्लेख करत हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "ते म्हणतात की, ते हिंदूंकडून हिशेब घेतील. मला मामन यांना सांगायचे आहे की, इस्रायलने दहशतवादाविरुद्ध केलेले काम आपण पाहिले आहे ना? आपल्या भारतातही दहशतवादाविरुद्ध काम होईल. दहशतवाद्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. हा देश हिंदूंनी निर्माण केला आहे. हिंदूंकडून कुणीही हिशेब घेऊ शकत नाही. हा देश हिंदूंनी बनवला आहे आणि हिंदूच देशाला महासत्ता बनवतील."
सरमा म्हणाले, "इस्रायलने नसराल्लाहला मारले तेव्हा INDI आघाडी रडत होती. सीमेवर जवान हुतात्मा झाल्यावर हे लोक रडतात का? जेव्हा हिजबुल्लाहचा कमांडर मरतो तेव्हा हे रडतात. मी मनापासून प्रार्थना करतो की, जगातून दहशतवाद संपायला हवा. दहशतवाद संपवण्यासाठी देव इस्रायलला आणखी शक्ती देवो. आम्ही शांतताप्रिय लोकांसोबत आहोत, जे दहशतवादाला आपला धर्म मानतात त्यांच्यासोबत नाही. देव इस्रायलला आणखी शक्ती देवो आणि देश-परदेशातील सर्व नसराल्लाह नष्ट होवोत."