Baby girl died : रुग्णालय गाठण्यासाठी बाप वणवण फिरला; ऑक्सिजन अभावी चिमुकलीनं बापाच्या कुशीत रस्त्यातच जीव सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:25 PM2021-04-28T20:25:09+5:302021-04-28T20:36:01+5:30
UP news a baby girl died : जेव्हा मुलीला कोणत्याच रुग्णालयात प्रवेश मिळाला नाही, तेव्हा ते जिल्हा रुग्णालयात गेले, तिथेही मुलीलाही ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजनअभावी रस्त्यातच या मुलीचा मृत्यू झाला.
(Image Credit- Amar ujala)
ऑक्सिजनच्या अभावामुळे मुझफ्फरनगरमध्ये ११ महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मुलीचे वडील तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी वण वण फिरत असाताच रस्त्यातच वडीलांच्या कुशित या चिमुरडीनं आपले प्राण सोडले. शहरातील विविध रुग्णालयं भटकल्यानंतर, जेव्हा मुलीला कोणत्याच रुग्णालयात प्रवेश मिळाला नाही, तेव्हा ते जिल्हा रुग्णालयात गेले, तिथेही मुलीलाही ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजनअभावी रस्त्यातच या मुलीचा मृत्यू झाला.
सहारनपूरमधील रहिवासी असेलेल अशोक पोलिस लाइनमध्ये आपल्या कुटूंबासह ते येथे राहतात. त्यांची 11 महिन्यांची मुलगी सोमवार रात्रीपासून आजारी होती. कशी तरी रात्र घालवली आणि सकाळी त्यांनी शहरातील अनेक रुग्णालय गाठले, तरीही कोणीही दाखल करून घेतले नाही.
कोविड झाल्यानंतरही रुग्णालयात परिक्षेची तयारी करताना दिसला तरूण ; IAS अधिकारी म्हणाले.....
या मुलीली ऑक्सिनजची आवश्यकता असल्याचे एका डॉक्टरांनी पाहिल्यानंतर सांगितले. सर्वत्र भटकल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन आपत्कालीन परिस्थितीत मुलीला दाखविले. तिथेसुद्धा त्यांच्या मुलीला ऑक्सिजन मिळू शकला नाही आणि वडीलांच्या कुशीतच त्याचा मृत्यू झाला.
वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....
दुसरीकडे, छोटूराम पदवी महाविद्यालयाचा लिपीक अरुण कुमार यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. निवडणुकीत कर्तव्य बजावल्यामुळे तिची तब्येत खराब होती, तिचा आरटीपीसीआर अहवाल येणे बाकी होते. यानंतर प्रकृती अधिकच बिघडली आणि कुटुंब इवान रुग्णालयात दाखल झाले. पण तेथील कर्मचार्यांनी त्याला दाखल करण्यास नकार दिला. अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला मार्ग सापडण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याला एटूज येथील निवासस्थानी आणण्यात आले.