आजारी पत्नीच्या औषधासाठी बाळ विकले!

By admin | Published: April 12, 2015 01:25 AM2015-04-12T01:25:29+5:302015-04-12T01:25:29+5:30

आदिवासींचा विकास आणि गरिबी निर्मूलनासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जात असतानाही या देशातील आदिवासी आजही किती अगतिक जिणे जगतो आहे

Baby sold for a sick wife's medicine! | आजारी पत्नीच्या औषधासाठी बाळ विकले!

आजारी पत्नीच्या औषधासाठी बाळ विकले!

Next

मलकानगिरी (ओडिशा) : आदिवासींचा विकास आणि गरिबी निर्मूलनासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जात असतानाही या देशातील आदिवासी आजही किती अगतिक जिणे जगतो आहे याची प्रचीती आणणारी हृदयद्रावक घटना ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात घडली. आपल्या आजारी पत्नीसाठी औषधे खरेदी करण्याची ऐपत नसलेल्या अशाच एका आदिवासी इसमाने आपले दोन महिन्यांचे बाळ फक्त ७०० रुपयांत एका महिलेला विकले.
सुकुरा आणि धुमुसी मुडुली हे आदिवासी दाम्पत्य कोरकुंडा ब्लॉकच्या चित्तापल्ली-२ येथील रहिवासी. त्यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या दोन महिन्याच्या मुलाला जवळीलच चित्तापल्ली-३ या खेड्यात राहणाऱ्या आशा कार्यकर्तीच्या (अधिस्वीकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ता) सुपूर्द केले. ही धक्कादायक बाब शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बालकल्याण समितीला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. जिल्हा बालकल्याण कमिटीच्या अध्यक्ष संजुक्ता प्रधान यांनी सांगितले की, या दाम्पत्याला इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल, तसेच बीपीएल व अन्य योजनांद्वारे मदतीचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)


दरम्यान, त्यांचे बाळ अद्याप आशा कार्यकर्तीच्याच ताब्यात आहे. सुकुरा आणि त्याची पत्नी बाळाची देखभाल करण्यास असमर्थ असल्याने तूर्तास त्याला आशा कार्यकर्तीकडेच ठेवले जाईल, असेही प्रधान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

४या गरीब आदिवासी दाम्पत्याला शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी राबविल्या जाणाऱ्या बीपीएल अथवा इंदिरा आवाससह कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही.
४रोजीरोटीचा बिकट प्रश्न, त्यातच पत्नीचे आजारपण; औषधे खरेदीसाठीही आपल्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव बाळाला या महिलेच्या स्वाधीन केले. त्या बदल्यात तिने औषध खरेदीसाठी ७०० रुपये आणि ५० किलो तांदूळ आपल्याला दिले होते, अशी कबुली सुकुराने दिली.

Web Title: Baby sold for a sick wife's medicine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.