इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय मागे

By Admin | Published: July 30, 2016 02:14 AM2016-07-30T02:14:18+5:302016-07-30T02:14:18+5:30

मंदिर महोत्सवात विधि करण्यास मज्जाव केल्यामुळे पझानकाल्लीमेडू गावातील दलित कुटुंबांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली होती.

Back to the decision to accept Islam | इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय मागे

इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय मागे

googlenewsNext

नागापट्टीणम : मंदिर महोत्सवात विधि करण्यास मज्जाव केल्यामुळे पझानकाल्लीमेडू गावातील
दलित कुटुंबांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली होती. मात्र, गावकऱ्यांनी या मुद्यावर गावातच तोडगा काढण्याचे एकदिलाने ठरविल्यानंतर दलितांनी हा निर्णय
मागे घेतला.
या मुद्याला वेगळे वळण लागून गावाची बदनामी होऊ नये म्हणून गावातील दलित व बिगर दलित लोकांची गुरुवारी सायंकाळी शांतता बैठक झाली. त्यात आपसात चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले. आमच्या गावात दलितांसोबत कथितरीत्या भेदभाव होत असल्याचे माध्यमांत दाखविले जात असून, त्याची आम्हाला शरम वाटते. न्यायालय व सरकार या मुद्यावर तोडगा शोधत आहेच; परंतु आम्ही या मुद्यावर आपसात चर्चा करून गावातील सौहार्द कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे गावातील बिगर दलित नागरिक ए सिवसुब्रमणी यांनी सांगितले. श्री भद्रकालीअम्मान मंदिरात दलित समुदायातील आपल्या मित्रांसोबतची चर्चा थांबवून सिवसुब्रमणी यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.
श्री भद्रकालीअम्मान मंदिरच गावातील जातीय तणावाच्या केंद्रस्थानी आहे. २५० दलित कुटुंबांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घोषित केला होता. (वृत्तसंस्था)

दोन वर्षांपासून मागणी
पाच दिवसांपैकी एक दिवस मंडागापडी करू देऊन आम्हाला सन्मान द्यावा, अशी मागणी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून करीत आहोत, असे गावातील ज्येष्ठ दलित नागरिक व्ही. मुरुगेसन यांनी सांगितले. शांतता बैठकीत मुरुगेसनही सहभागी झाले होते.

Web Title: Back to the decision to accept Islam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.