राजधानीला खराब हवामानाचा फटका, 25 विमानांचे मार्ग बदलले
By admin | Published: May 30, 2016 12:16 AM2016-05-30T00:16:52+5:302016-05-30T00:16:52+5:30
देशभरात अद्यापही पाऊस सक्रिय झाला नसला तरी राजधानी दिल्लीत वादळी वा-यांमुळे हवामान बिघडलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30- देशभरात अद्यापही पाऊस सक्रिय झाला नसला तरी राजधानी दिल्लीत वादळी वा-यांमुळे हवामान बिघडलं आहे. खराब हवामानामुळे जवळपास 25 विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्नाटकाला जाणा-या विमानाची दिशा बदलून त्याला दिल्लीहून थेट जयपूरला वळवण्यात आलं आहे.
दिल्लीत अतिवेगवान वादळी वारे वाहत असून, तापमानही 31 अंश डिग्री सेल्सियसच्या खाली गेलं आहे. राजधानीत रात्री 9 च्या दरम्यान हलक्या सरींचा पाऊस पडला आहे
. एक धुळीचं वादळ प्रतितास 92 किलोमीटरचा प्रवास करून दिल्लीच्या जवळ झेपावत असल्याचा अंदाज पाल्मा वेधशाळेनं व्यक्त केला आहे. केंद्रीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार धुळीचं वादळ उद्यापर्यंत दिल्लीत धडकणार असून, उद्या तापमान 37 ते 26 अंश सेल्सिअस राहणार आहे.