बादल परिवाराला सत्तेतून पायउतार करणार

By admin | Published: January 23, 2017 04:18 AM2017-01-23T04:18:53+5:302017-01-23T04:18:53+5:30

भाजपाचा त्याग करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून

The Badal family will be removed from power | बादल परिवाराला सत्तेतून पायउतार करणार

बादल परिवाराला सत्तेतून पायउतार करणार

Next

अमृतसर : भाजपाचा त्याग करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याकारणाने यावेळी सर्वांच्या नजरा याच मतदारसंघाकडे लागलेल्या आहेत. ‘पंजाब बचाओ’ हे आपले मिशन आहे आणि पंजाबला लुटणाऱ्या बादल परिवारालाच सत्तेतून पायउतार करण्याचा आपला हेतू आहे, असे सांगून सिद्धू यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतलेली आहे.
५३ वर्षीय सिद्धू अमृतसर पूर्वमध्ये निवडणूक मैदानात उतरल्यापासून इतर सर्व उमेदवार त्यांच्या सावलीमागे जणू लुप्त झाल्यासारखे वाटत आहेत. भाजपाचे जिल्हाप्रमुख आणि पक्षाचे नगरसेवक राजेशकुमार हनी हेही या मतदारसंघातून नशीब अजमावत आहेत.
हनी यांनी २००७ आणि २०१२ मध्ये महानगर पालिकेची निवडणूक जिंकली होती. अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढविणाऱ्या १५ उमेदवारांमध्ये ५ अपक्ष आहेत. ‘आप’चे सरबज्योत सिंग हेही येथे निवडणूक लढवित आहेत तर बसपाने तरमेस सिंग यांना आणि भाकपाने बलदेव सिंग यांना उमेदवारी दिली आहे.
अमृतसरमध्ये कडाक्याची थंडी आहे. अशात सिद्धू आपल्या निवडणूक प्रचाराच्या प्रत्येक भाषणाला म्हणी आणि शेरशायरीचा साज चढवून वातावरणात जोश निर्माण करीत आहेत. सिद्धू आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत बादल परिवारावर कडाडून हल्ला चढवितात आणि ‘भाग बादल भाग, कुर्सी खाली कर’ यासारख्या घोषणांचा वापर करीत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The Badal family will be removed from power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.